Wednesday, June 26, 2024

‘लाखो दिलों की धडकन!’ रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील ‘ते’ सत्य, जे कोणालाही माहित नाही; सुंदर हास्यामागे आहेत बऱ्याच वेदना

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये केवळ आपल्या स्माईलने कोट्यावधी चाहत्यांना वेड लावणारी, रश्मिका मंदाना या दिवसांमध्ये खूप चर्चेत आहे. रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मिशन मजनू’ मध्ये देखील दिसणार आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त ती तेलुगुमध्ये ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनय करणार आहे. एकूणच, रश्मिकाकडे आनंदी राहण्यासारखे बरेच काही आहे. बुधवारी (5 एप्रिल) रश्मिका आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. कायम मस्ती-मजा करून हसत-खेळत राहणाऱ्या रश्मिकाच्या आयुष्यात एक असे ‘सत्य’ देखील आहे, जे कधीही समोर आले नाही. आज तिच्या वाढदिवसाबद्दल आपण याबाबत जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया.

कर्नाटकमध्ये झाला जन्म, तर कॉलेजमध्येच सुरू केली मॉडेलिंग
दिनांक 5 एप्रिल, 1996 रोजी कर्नाटकच्या विराजपेटमध्ये जन्मलेल्या रश्मिकाने आपले बालपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात घालवले. तिने म्हैसूर इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्समधून प्री-युनिव्हर्सिटी कोर्स केला. मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यमध्ये तिने पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असतानाच रश्मिकाने मॉडेलिंग सुरू केली आणि बर्‍याच टीव्ही कर्मश‍ियल्‍सचा ती भाग बनली.

‘टाईम्स फ्रेश फेस’ आणि मिळाली चित्रपटाची ऑफर
रश्मिका अगदी वेगाने तिच्या आयुष्यात प्रगती करत होती. 2014 मध्ये तिने ‘टाईम्स फ्रेश फेस ऑफ इंडिया’ ही उपाधी मिळविली. त्यानंतर 2015 मध्ये बंगळुरूमध्ये ‘टॅलेंट हंट’ ती जिंकली. दरम्यान, दिग्दर्शक रिषभ शेट्टी, निर्माता जीएस गुप्ता आणि रक्षित शेट्टी यांची नजर रश्मिकावर पडली, तेव्हा ‘किरिक पार्टी’ या पुढच्या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्री असेल, असा निर्णय घेण्यात आला होता.

अवघ्या 19व्या वर्षी ब्लॉकबस्टर पदार्पण
वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी रश्मिका मंदानाने ‘किरिक पार्टी’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. पण या चित्रपटाच्या सेटवर आणखी एक गोष्ट घडली. रश्मिका मंदाना आणि चित्रपटाचा अभिनेता रक्षित शेट्टीची मैत्री प्रेमात बदलू लागली. चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात चर्चा आणि संवाद चालूच होते. बघता बघताच ते एकमेकांना डेट करू लागले.

जीवनात आली सुखाची लहर
‘किरिक पार्टी’ चित्रपट सुपरहिट होता आणि रश्मिका-रक्षितची जोडीही. चाहतेही या जोडीवर खूप प्रेम व्यक्त करायचे. अफेअरच्या चर्चेच्या दरम्यान रश्मिकाने देखील याची पुष्टी केली की, ती रक्षितला डेट करत आहे. तिने रक्षित आणि तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, “आमच्या छोट्या कुटुंबात आपले स्वागत आहे.”

2017 मध्ये केली एंगेजमेंट
या दोघांनी 3 जुलै, 2017 रोजी साखरपुडा केला. साखरपुड्याच्या फोटोंमध्ये या लव्ह बर्ड्सला पाहून चाहते खूप खूश झाले. सर्व काही व्यवस्थित चालू होते, पण त्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली.

एका वर्षानंतरच तुटले नाते
साखरपुड्याच्या बरोबर एक वर्षानंतर सप्टेंबर 2018 मध्ये रश्मिका आणि रक्षितचे नाते तुटले. यावर दोघेही कधी उघडपणे बोलले नाहीत. जवळच्या लोकांकडून बातमी आली की, या दोघांमध्ये सुसंगततेचे प्रश्न आहेत. म्हणजेच परस्पर समरसतेच्या कमतरतेमुळे, समान पद्धती नसल्यामुळे हे नाते तुटले. या बातमीमुळे या जोडप्याच्या लाखो चाहत्यांची मनेही मोडली.

रश्मिकावर उचलले जाऊ लागले बोट
जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा रक्षित सोशल मीडियापासून दूर होता. त्याने त्याचे फेसबुक अकाऊंटही निष्क्रिय केले होते. पण जेव्हा लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले, तेव्हा रक्षितने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्याने लिहले की, “मी तुमच्यापैकी कोणालाही दोष देत नाही. पण तुम्ही ज्या प्रकारे रश्मिकाबद्दल मते मांडत आहात, ते योग्य नाही. मी दोन वर्षांपासून रश्मिकाला ओळखत आहे आणि तिला तुम्हा सर्वांपेक्षा जास्त मी ओळखतो. आमचे नाते बिघडण्यामागे एकच कारण नाही. म्हणून तिला जज करणे सोडा. कृपया तिच्या आयुष्यातील शांतता भंग करू नका.”

‘एक दिवस सर्वांना सत्य कळेल’
रक्षितने पुढे त्याच्या निवेदनात म्हटले की, “मला वाटते प्रत्येक गोष्टींचा एक अंत असतो आणि जेव्हा हे घडेल, तेव्हा तुम्हा सर्वांना सत्य नक्कीच समजेल. गरज भासल्यास मी पुन्हा सोशल मीडियावर येईल. पण आता हे सोडण्यामागे रश्मिका किंवा माझे नाते, हे कारण नाही.”

आजही गुलदस्यात आहे ते ‘सत्य’
रक्षितने 2018 मध्ये या गोष्टी बोलल्या होत्या. त्यानंतर आता तीन वर्षे झाली आहेत. अभिनेत्याने आपल्या वक्तव्यात म्हटलेल्या ‘सत्या’बद्दल रक्षित किंवा रश्मिका अद्याप बोलले नाहीत. याशिवाय, लाखो चाहत्यांनी या जोडप्याला खूप प्रेम दिले. यांच्यात असे काय घडले, ज्यामुळे नातेसंबंध तुटले, हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. तथापि, गोपनीयता देखील एक गोष्ट आहे. बर्‍याच वेळा सेलिब्रेटींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी उघडपणे सांगण्याची इच्छा नसते. ही चांगली गोष्ट देखील आहे. अशा परिस्थितीत ते ‘सत्य’ क्वचितच समोर येऊ शकेल. (actress rashmika mandanna love story with rakshit shetty engagement and breakup reason 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : यशाचे शिखर गाठलेल्या रश्मिका मंदानाला बनायचे नव्हते अभिनेत्री, ‘अशाप्रकारे’ मिळाला होता पहिला चित्रपट
BIRTHDAY SPECIAL : रश्मिका मंदान्नाच्या ‘या’ सवयीमुळे तिचे कुटुंबीय आहेत नाराज, जिद्दीपुढे घरच्यांचेही नाही ऐकत अभिनेत्री

हे देखील वाचा