आपल्या अभिनयाच्या जोरावर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना होय. केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर रश्मिका बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. जिथे जाईल, तिथे आपल्या अभिनयाचा जादू दाखवल्यामुळेच कदाचित तिला ‘नॅशनल क्रश’ म्हटले जाते. ती बॉलिवूडमध्ये येणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. तिच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच आता तिचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत रश्मिका बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील सुपरहिट डायलॉग ‘एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो’ आपल्या स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहे. (Actress Rashmika Mandanna Recreated Deepika Padukone Dialogue Ek Chutki Sindoor Ki Keemat)
विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून दीपिका इतकी खुश झाली की, तिनेही हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबतच तिने “मोहक,” असे लिहिले आहे.
[Instagram-2] Deepika Padukone commented on Faridoon Shahryar's post about Rashmika Mandanna via her story : "Adoooorable @iamRashmika @iFaridoon" pic.twitter.com/WAkpGSVNWc
— Deepika Padukone FC (@DeepikaPFC) September 22, 2021
रश्मिकाचा हा व्हिडिओ एका मुलाखतीतील आहे. यामध्ये ती दीपिकाचा डायलॉग बोलताना दिसत आहे आणि यानंतर ती खळखळून हसतानाही दिसत आहे.
रश्मिकाच्या प्रसिद्धीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत असते. यावेळी अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ भलताच चर्चेत आहे. या व्हिडिओत तिने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. यातील रश्मिकाचा ग्लॅमरस लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओत रश्मिका गाडीतून उतरून चालताना दिसत आहे. यानंतर फोटोग्राफर्सला पोझही देताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक इंग्रजी गाणेही वाजत आहे.
रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मिशन मजनू’व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटातही झळकणार आहे. तिच्याबाबत बोलायचं झालं, तर रश्मिका तेलुगू आणि कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
रश्मिकाने सन २०१६मध्ये ‘किरिक पार्टी’मधून कन्नड चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यानंतर तिने सन २०१८ मध्ये ‘चलो’ चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. रश्मिकाला ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या हिट चित्रपटांतून विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी