दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जर डोकावून पाहिलं, तर तिथे आपल्याला अनेक सुंदर, सोज्वळ अशा अभिनेत्री पाहायला मिळतील. या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. यातीलच एक अभिनेत्री जिला ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखले जाते, ती म्हणजेच रश्मिका मंदाना होय. रश्मिका आपल्या एक्सप्रेेशन्समुळेही चांगलीच प्रसिद्ध आहे. रश्मिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. नुकतेच ती दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’ चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटाचा टिझरही लाँच करण्यात आला होता. यामुळेही ती चांगलीच चर्चेत होती. अशातच तिने एक दिवसापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी लाईव्ह चॅट सेशनचे आयोजन केले होते. यादरम्यान तिला चाहत्याने अनेक प्रश्न विचारले आणि तिनेही चाहत्यांच्या प्रश्नांची भरभरून उत्तरे दिली.
‘द कपिल शर्मा शो’ची आहे मोठी चाहती
रश्मिकाने (Rashmika Mandanna) यादरम्यान ‘पुष्पा’ आणि सहकलाकार अल्लू अर्जुनबद्दलही (Allu Arjun) बरीच चर्चा केली. यासोबतच तिने हेही सांगितले की, ती टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ची (The Kapil Sharma Show) खूप मोठी चाहती आहे. एका चाहत्याने तिला या शोसंबंधित प्रश्न विचारला होता, ज्यावर प्रत्युत्तर देत रश्मिकाने प्रत्युत्तर दिले की, ती या शोची खूप मोठी चाहती आहे आणि हा शो सुरू झाल्यानंतर तिला यामध्ये जायला आवडेल.
शोमध्ये जाण्यास रश्मिका उत्सुक
तिने म्हटले की, “मी शोबाबत खूपच उत्सुक आहे. एकदा माझी बॉलिवूड चित्रपटांची शूटिंग पूर्ण होऊ द्या. त्यानंतर मी प्रमोशनला सुरुवात केल्यानंतर या शोमध्ये नक्की जाईल. मी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे. मी कपिलची खूप मोठी चाहती आहे.” (Rashmika Mandanna Is A Biggest Fan of Kapil Sharma) याव्यतिरिक्त अल्लू अर्जुनच्या व्यवहाराबद्दलही तिने सांगितले.
‘साधारण व्यक्तिमत्त्व आहे अल्लू अर्जुन’
रश्मिकाने सांगितले की, अल्लू अर्जुन खूपच साधारण आणि सरळ राहतो. तो खूपच चांगला व्यक्ती आहे. मला त्याच्यासोबत काम करताना खूपच मजा आली आहे.
लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण
ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती नुकतीच महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘गुडबाय’ आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित ‘मिशन मजनू’ चित्रपटाची शूटिंग करत होती. सध्या कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र आणि देशातील अनेक राज्यातील शूटिंग थांबली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने पार्कमध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही थिरकाल