सध्या सिनेजगतात काही नवीन बदल पाहायला मिळत आहेत. फक्त आपापल्या सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये काम करू पाहतायत. म्हणजेच सध्या सिनेजगतात पॅन इंडिया सिनेमांना खूप महत्त्व दिले जात आहे. विशेषत: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील अंतर कमी केले जात आहे. सध्या बॉलिवूड कलाकार दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसत आहेत, तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारही बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत.
या कलाकारांमध्ये ‘नॅशनल क्रश’ (National Crush) म्हणून ओळखली जाणारा अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. रश्मिकाच्या दाक्षिणात्य सिनेमांना हिंदी प्रेक्षकांनाही जोरदार पसंती दर्शवली होती. विशेष म्हणजे, जेव्हा तिचा ‘पुष्पा‘ हा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रदर्शित झाला, त्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या आणखीच वाढली. या सिनेमामुळे तिची बॉलिवूडमधील क्रेझही जबरदस्त वाढली. त्यामुळेच तिला आता बॉलिवूडमधूनही ऑफर येऊ लागल्या आहेत आणि ती हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण करत आहे.
‘सीता रमण’ सिनेमाचा लूक जाहीर
अभिनेत्री रश्मिका मंदाना ही ‘सीता रमण’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. तिने या सिनेमातील तिची पहिली झलक शेअर केली आहे. यावेळी तिने लूक जाहीर करण्यासाठी वेगळी पद्धत वापरली होती. तिने सिनेमातील पहिली झलक जाहीर करण्यासाठी ईद उल-अजहा हा दिवस निवडला होता. रश्मिकाने तिच्या आगाी सिनेमासंदर्भातील फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा (Rashmika Mandanna Wishes Eid Mubarak) दिल्या.

सिनेमातील पोस्टरवरून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
रश्मिकाने शेअर केलेले पोस्टर पाहून चाहत्यांची सिनेमाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाची नाव ‘सीता रमण’ आहे आणि त्यात तिने हिजाब परिधान केल्याचे दिसत आहे. रश्मिकाने तिच्या चाहत्यांना तिच्या ऑफरीन या पात्राची भेट करून दिली आहे.
सिनेमात रश्मिकासोबत दाक्षिणात्य अभिनेता दलकीर सलमान आणि मृणाल ठाकूर हे कलाकारदेखील दिसणार आहेत. दलकीर सलमान या सिनेमात एका सैनिकाच्या भूमिकेत आहे, तर मृणाल ही त्याच्या प्रेमिकेची भूमिका साकारत आहे.
बॉलिवूडमध्ये लवकरच करणार एन्ट्री
रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘मिशन मजनू’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. दुसरीकडे, ती टायगर श्रॉफ या अभिनेत्यासोबतही एका सिनेमात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. रश्मिका, करण जोहर होस्ट करत असलेला प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण ७’ यामध्येही झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जॅकलिन करणार बायोपिकमध्ये काम, उलगडणार ‘या अभिनेत्रींच्या हत्येचं गुपित
रणवीर सिंग बनला शाहरुख खानचा शेजारी, केले ‘इतक्या’ कोटींचे घर खरेदी