‘रोडीज‘ फेम रणविजय सिंग लवकरच एक नवीन शो घेऊन येत आहे. हा शो यूट्यूब वर प्रसारित होईल. या शोची पहिली पाहुणी अभिनेत्री रवीना टंडन आहे. ‘कारखाना: फूड अँड ऑटो’ शो असे या शोचे नाव आहे. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये रवीना टंडन तिच्या पहिल्या कार खरेदीच्या अनुभवाबद्दल सांगत आहे. यासोबतच ती तिचं खाद्यप्रेमही व्यक्त करत आहे. प्रोमोमध्ये रणविजय आणि रवीना दोघेही खूप मस्ती करताना दिसत आहेत.
‘कारखाना’ शोमध्ये रणविजय सिंग (ranvijay singha) सोबत झालेल्या संभाषणात रवीना टंडन (raveena tandon) हिने तिच्या पहिल्या कारबद्दल खुलासा केला. रवीनाने सांगितले की, “तिने 18 वर्षांची असताना पहिली कार खरेदी केली होती.” तिने असेही सांगितले की, “ही एक जुनी स्पोर्ट्स कार होती जी तिने तिच्या पहिल्या कमाईने खरेदी केली होती.”
रवीना टंडन म्हणते, “ज्या दिवशी मी 18 वर्षांची झाली, तेव्हा मी माझी पहिली कार घेतली. ती कोणाचीतरी स्पोर्ट्स कार होती आणि फार जुनी देखील. कुणी तरी ते कार विकत होते. अशात मी माझ्या पहिल्या कमाईने ते विकत घेतली. ही मी मला स्वतःहून दिलेली भेट होती. आणि त्यानंतर माझी पहिली नवीन कार मारुती 1000 होती. तर दुसरी जुनी गाडी होती माझी पजेरो, आम्ही तिला ‘रोड राणी’ म्हणायचो.
View this post on Instagram
रवीना टंडनने सांगितले की, “कार खरेदी करताना मी कंफर्ट आणि तिची स्पेस याकडे जास्त लक्ष देते.” ते म्हणाली की, “गाड्यांमध्ये खूप टेक्नोलॉजी असेल तर मी गोंधळून जाते.” रवीना टंडन पुढे म्हणाली, “आमच्याकडे नेहमी शुभ दिवशी कार पार्क केलेली असते. ही न्यूमेरिक डेट नाही, पण हो, आमच्या सर्व वाहनांवर एकच नेमप्लेट आहे कारण ती माझ्या मुलीची जन्मतारीख आहे.
रवीना टंडन पुढे म्हणाली, “आमच्या सर्व गाड्या एकाच नंबरवर आहेत. फक्त 16 नाही तर त्या सर्व संख्या ज्या 16 पर्यंत जोडतात. त्यामुळे आम्ही अशा नेमप्लेट क्रमांकांची मागणी करतो.” म्हणजेच रवीनाच्या वाहनांचे क्रमांक असे आहेत, जे मिळून 16 होतात किंवा ज्यात 16 क्रमांक येतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुन कपूरने रोमांटिक फोटो शेअर करत मलायकाला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभच्छा..
झायरा वसीमने बॉलिवूड इंडस्ट्रीला ठोकला राराम! कारण ऐकूण तुम्ही व्हाल थक्क…