Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड जेव्हा रेखांनी केली होती अभिनेत्री बनण्याची इच्छा व्यक्त, मित्र म्हणाले होते, ‘तोंड बघितलं का आरशात’

जेव्हा रेखांनी केली होती अभिनेत्री बनण्याची इच्छा व्यक्त, मित्र म्हणाले होते, ‘तोंड बघितलं का आरशात’

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री होऊन गेल्या. काहींनी अवघा एक चित्रपट करून इंडस्ट्रीला राम राम ठोकला, तर काही अभिनेत्रींनी कष्टाने आणि जिद्दीने नावलौकिक मिळवले आहे. यातीलच एक नाव म्हणजे रेखा. ‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है’, ही पंक्ती ज्यांना तंतोतंत जुळते त्या म्हणजे बॉलिवूड क्वीन रेखा. खरं तर, रेखा या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, परंतु सौंदर्याच्याबाबत आजही त्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. सौंदर्याने त्यांनी लाखोंना घायाळ केले आहे. आज त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

रेखा यांनी हे नाव कमावण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. लहान असताना जेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांसमोर हिरोईन होण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा त्यांच्यावर सगळे खूप हसत होते. त्यांनी १९६६ मध्ये बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधीच त्या व्यक्तींकडे मागे वळून पाहिले
नाही, जे त्यांच्यावर हसले होते.

एका चॅट शोमध्ये रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील ते क्षण व्यक्त केले होते. जेव्हा लोकं त्यांच्यावर हसत होती, परंतु आयुष्यात मिळालेल्या यशाने त्यांचे संपूर्ण आयुष्यचं बदलून टाकले. रेखा यांनी सांगीतले होते की, ‘सावन’ चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्या आयुष्यात खूप बदल झाला. त्यावेळी त्यांच्या मित्रांना हे समजले की, त्या किती प्रतिभावान अभिनेत्री आहेत. ज्यांच्याकडे बघून सगळे म्हणत होते की, त्यांच्याकडे अभिनेत्री बनण्यासारखा चेहरा नाहीये.

रेखा यांनी सांगितले होते की, “मला खूप प्रेम आणि महत्व मिळत होते, त्यामुळे मला खूप आनंद होत होता. माझ्या बहिणी देखील खूप खुश होत्या. आम्ही त्यावेळी गाडी खरेदी करू शकत होतो, घर खरेदी करू शकत होतो, एवढंच काय, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊ शकत होतो, ज्याची आम्हाला गरज होती. त्यावेळी माझे मित्र-मैत्रिणी माझ्यावर खूप जळायला लागल्या. जेव्हा मी त्यांना म्हणायची की, काय माहित मी जर उद्या जाऊन एखादी मोठी अभिनेत्री झाले तर… त्यावेळी ते मला म्हणायचे की, तुझे तोंड पाहिले का आरशात. जेव्हा माझे चित्रपट हिट झाले, तेव्हा सगळे म्हणू लागले की, भानू जे बोलली ते तिनं करून दाखवलं.”

रेखा यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु त्यांना कधी अभिनेत्री बनायचे नव्हते. त्यांनी सांगितले की, “वयाच्या १३ व्या वर्षी मी कधी अभिनेत्री बनण्याचा विचार देखील केला नव्हता. त्यावेळी मी केवळ हा विचार करत होते की, माझ्यावर कोणीतरी प्रेम करावं, नेहमी माझ्यासोबत असावं, आम्हाला दोन मुलं असावीत.”

परंतु रेखा यांचे लग्न यशस्वी झाले नाही. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या अफेअरमुळे ते दोघे देखील खूप चर्चेत आले होते. असं म्हणतात की, बिग बी आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांची पत्नी जया आणि त्यांचे लग्न तुटणार होते. परंतु जया यांनी त्यांचा संसार वाचवला. रेखा यांचे प्रेम, संसार आणि मुलांचे स्वप्न अधुरे राहिले, परंतु करिअरमध्ये त्यांनी त्यांचे नाव कमावले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमारांनी अनेक दशकं केलंय चित्रपटसृष्टीवर राज्य, स्वत: च्या मृत्यूबद्दल मुलाला सांगितली होती ‘ही’ गोष्ट

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केलाय ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाच्या शर्टचा बनवला होता रुमाल

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा