आजच्या काळात तंत्रज्ञानसोबतच अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सिनेसृष्टीदेखील आधीपेक्षा खूप अपडेट झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात घडणाऱ्या सर्वच गोष्टी पटकन बाहेर येतात आणि जगभर पसरतात. २०१८ साली बॉलिवूडमध्ये एक मोठी चळवळ सुरु झाली, ज्यामुळे या क्षेत्रात अक्षरशः भूकंप झाला. ही चळवळ होती मी टू ची. अभिनेत्री तनुश्री दत्ताने या चळवळीची सुरुवात केली होती. पुढे ही चळवळ फक्त बॉलिवूडनाही तर सामान्य लोकांमध्ये देखील पसरली. त्यानंतर अनेक सामान्य महिलांनी समोर येऊन त्यांच्यासोबत झालेल्या वाईट वागणुकीला वाचा फोडली. यात बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आदी अनेक लोकांवर मिटू मार्फत आरोप केले. याच मोहिमेला अभिनेत्री रेणुका शहाणेने देखील तिचे समर्थन दर्शवले आहे.
रेणुका शहाणेने मिटू चळवळीबद्दल बोलताना एका मुलाखतीमध्ये सांगितले की, अनेक लोकं तिला देखील शांत राहण्याबद्दल सांगतात. अनेकदा महिलांना हे बोलू नका सांगितले जाते. तुला असे कोणी म्हटले आहे का? यावर ती म्हणाली,“नक्कीच हो खूप लोकांनी मला हा सल्ला दिला होता. खरं सांगायचे तर लहानपणापासून प्रत्येक मुलीला हे बोलू नकोस, हे करू नको असे सांगितले जाते. त्यामुळे मला वाटते की मी टू चळवळ ही फार महत्त्वाची होती किंबहुना आहे. कारण त्या चळवळीमुळे एका महिलेला काही वर्षांपूर्वी झालेला अत्याचार याद्वारे व्यक्त करता आला, येत आहे. या चळवळीद्वारे अनेक महिलांनी त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “या चळ्वळीनंतर अनेकांनी इतक्या वर्षांनी ती स्त्री हे का बोलली? असे प्रश्न उभे केले. पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही महिलांना कधी बोलू दिले का आपल्याकडे जास्त अत्याचार हे कुटुंबातच घडतात. जेव्हा तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी याबद्दल सांगतात, तेव्हा किती पालक त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे कुटुंबाशी नातेवाईकांशी संबंध तोडतात? किंवा तोडण्यास तयार होतात? मला असे वाटते की या सर्व गोष्टी तिथून सुरु होतात. त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांपेक्षा पीडित मुलाला किंवा मुलीलाच जास्त दोषी वाटायला लागते”.
पुढे रेणुका शहाणे म्हणाली, ” एखाद्या मुलीने खूप जास्त प्रश्न विचारले की लोक कंटाळतात. ती खूप प्रश्न विचारते? असे म्हणतात, पण त्या उलट जर एखादा मुलगा प्रश्न विचारत असेल तर त्या मात्र प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडे लोक स्त्रियांना नकारात्मक रुपात जास्त पाहतात.” असे रेणुका शहाणे यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी हे देखील सांगितले की ९० च्या दशकात सिनेमाच्या सेटवर अनेक मूलभूत सुविधा नव्हत्या. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
दरम्यान रेणुका शहाणे यांनी ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. हिंदीसोबतच त्यांनी मराठी आणि टेलिव्हिजनवर देखील त्यांची उपस्थिती दर्शवली. त्या दिग्दर्शनात देखील सक्रिय असून त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ, व्हिडिओ झाला व्हायरल