‘बिग बॉस १५’ मध्ये झळकणाऱ्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. अशात सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या नावाची अफवा देखील पसरली आहे. यामध्ये छोट्या तसेच मोठ्या पदाद्यावरील अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे देखील नाव या शोला जोडले गेले होते.
रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने अनेक वादांचा सामना केला आहे. आता अखेर तिच्या आयुष्यात थोडे सुखाचे दिवस आले आहेत. ती बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. परंतु आता या सर्व अफवा बंद होणार आहेत. कारण आता तिने स्वतः याचा खुलासा केला आहे. (actress Rhea Chakraborty on Bigg Boss 15 says I am not part of this show)
रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा
रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. तिने यामध्ये लिहिले आहे की, “मला माहिती आहे माझ्याबद्दल अशी अफवा पसरवली जात आहे की, मी ‘बिग बॉस १५’ या शोची सदस्य होणार आहे. परंतु हे सर्व खोटं आहे. मी बिग बॉसची सदस्य नाही.”
रियाला मिळणार होते ३५ लाखांहून जास्त पैसे
अभिनेत्रीने या आधी बऱ्याच वादांचा सामना केला आहे. अशात आता पुन्हा वादग्रस्त शोमध्ये जाणे तिला पसंत नाही. परंतु तिच्या नावाची खूप अफवा पसरवली गेली होती. अनेकांनी तिला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून प्रत्येक आठवड्यासाठी ३५ लाख रुपये दिले जाणार असल्याचे देखील म्हटले होते.
रियाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकतीच ‘चेहरे’ या चित्रपटामध्ये झळकली होती. चाहत्यांकडून तिच्या या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. तसेच साल २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जलेबी’मधून तिने चाहत्यांचे मनावर राज्य केले होते. तिच्या या चित्रपटाला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये चाँद सा रोशन चेहरा’, समृद्धी केळकरच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा