Monday, July 1, 2024

कुणी म्हणतंय ‘सुपर’, तर कुणी ‘व्हेरी हॉट’, डीपनेक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसची हद्दच केली पार

अफलातून अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्या नावाचाही समावेश होतो. रिचाने रुपेरी पडद्यावर अशा काही भूमिका साकारल्या आहेत, त्या खऱ्या आयुष्यात पाहण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. रिचा तिच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशात तिच्या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. या फोटोंमध्ये ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे.

अभिनेत्री रिचा चड्ढा हिने शेअर केला बोल्ड फोटो
अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्या फोटोंबद्दल बोलायचं झालं, तर तिने यावेळी हद्द पार केली आहे. ती नेहमीपेक्षा जास्त किलर लूक देताना दिसत आहे. ती ब्रालेस लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने यादरम्यान न्यूड मेकअप केला आहे. तसेच, तिने तिचे केसांचा अंबाडा केला आहे. यासोबतच तिने ऍक्सेसरीजच्या नावावर फक्त कानातले घातले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

जोरदार व्हायरल होतोय रिचाचा बोल्ड अंदाज
सोशल मीडियावर रिचा चड्ढा हिचे फोटो जोरात व्हायरल होत आहेत. यासोबतच तिच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत १३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत. चाहते तिच्या या लूकची प्रशंसा करताना दिसत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने “लव्ह,” असे लिहीत फायर इमोजीही शेअर केला आहे. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “भोली पंजाबन.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू माझी सर्वात आवडती आहेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

जबरदस्त अभिनयाने मिळाली ओळख
रिचा चड्ढा हिने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. ती ‘फुकरे ३’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा ‘भोली पंजाबन’ भूमिकेत झळकताना दिसणार आहे. यानंतर ती ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या सिनेमातही झळकताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

टुनटूनने लहानपणी पाहिलाय आई-वडील आणि भावाचा खून, मुंबईला पळून येऊन काढलेत गरिबीत दिवस

सिनेमाचं नाव ‘सीता रमण’, पण रश्मिकाने का शेअर केला लाल रंगाच्या हिजाबातील फोटो?, घ्या जाणून

कपिल शर्मा शोमधील अर्चना पुरणने सांगितला तिचा धक्कादायक अनुभव

हे देखील वाचा