अभिनेत्री रिचा चड्ढा ही नेहमीच सामाजिक प्रश्नांवर सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असते. प्रत्येक नागरिक हा या लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे प्रत्येकाला चालू असणाऱ्या घटनांबद्दल बोलण्याचा समान अधिकार आहे, असे तिचे मत आहे. ती नेहमीच सामाजिक प्रश्नांना घेऊन काही ना काही प्रत्युत्तर देताना दिसते. या वेळी रिचाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून थेट भारताचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांच्यावर निशाणा साधला आहे.
रिचा नेहमीच सामाजिक प्रश्नावर आपले मत मांडत असते. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा ट्रोलिंग देखील सामना करावा लागतो. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी ‘नास कॉम टेक्नॉलॉजी लीडरशिप फोरम’ या कंपनीला संबोधित केले आहे. डिजिटल अर्थकारणचे फायदे सांगताना ते म्हणाले की, ” डिजिटल अर्थकारणामुळे गैरव्यवहार खूप कमी निदर्शनास येतात. त्यामुळे नागरिक देखील सशक्त झाले आहेत. खूप कमी वेळात आपण नकदी अर्थव्यवस्थेपासून कमी नकदी अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली आहे.” मोदींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक नागरिक यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
This is a very honest admission. There is less cash. https://t.co/2ZwVdGzqeT pic.twitter.com/OmbVxsUhmt
— RichaChadha (@RichaChadha) February 17, 2021
नरेंद्र मोदी यांच्या याच वक्त्याव्याला घेऊन रिचाने ट्विट केले आहे की, ” अगदी प्रामाणिकपणे खरचं आपण कमी नकदी अर्थव्यवस्थेकडे चाललो आहोत का?” यासोबतच रिचाने एका रिकाम्या पाकीटचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यातून तिला असे म्हणायचे आहे की, लोकांकडे आता पैसाच राहिला नाहीये.
रिचाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच तिचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.