Wednesday, July 3, 2024

आजीच्या साडीत कमालीच्या सुंदर दिसणाऱ्या रिंकूने सर्वांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

आपल्या भारतात सण उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाला एक इतिहास आणि महत्व आहे. यातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर ) दसरा साजरा होत आहे. याच दिवशी श्रीराम प्रभूंनी रावणाचा वध करून सीतामातेला आयोध्येत परत आणले होते. याच निमित्ताने सर्वत्र दसरा साजरा होतो. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभूंनी रावणाच्या सोन्याच्या लंकेवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे या दिवशी सगळेजण एकमेकांना सोनं म्हणजेच आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतून देखील अनेक कलाकार दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत. यातच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर तिचे काही पारंपरिक वेशतील फोटो शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पिवळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसली असून, त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. हातात लाल रंगाच्या बांगड्या, सोनेरी रंगाची ज्वेलरी आणि कपाळी टिकली लावली आहे. या पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress rinku rajguru share her traditional look photos on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.” तसेच या कॅप्शनमध्ये तिने हे देखील सांगितले आहे की, तिने तिच्या आजीची साडी नेसली आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “आई शप्पथ साडीवरती परीच दिसतीये.” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत आणि तिला दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रेड स्वीमिंग सूटमध्ये कमाल दिसतेय रकुल प्रीत, पूलमध्ये पाहायला मिळाला बोल्ड अंदाज

-…म्हणून राहुल वैद्यला येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवक्त्याने उघड केलं कारण

-समुद्रकिनारी पत्नी अंकितासोबत एन्जॉय करताना दिसले मिलिंद सोमण, व्हायरल होतोय रोमॅंन्टिक व्हिडिओ

हे देखील वाचा