Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ओहह! करीना आणि रिया व्हॉट्सऍपवर काय काय बोलतात माहितीये? वाचून तुम्हालाही येईल मजा

ओहह! करीना आणि रिया व्हॉट्सऍपवर काय काय बोलतात माहितीये? वाचून तुम्हालाही येईल मजा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि रिया कपूर यांचे एकमेकींशी चांगले बॉन्डिंग आहे. दोघीही खाण्यापिण्याचे शौकीन आहेत, त्यामुळे अनेकदा ते एकमेकांसोबत पार्टी करताना दिसतात. अनिल कपूरची लाडकी मुलगी रियाला सध्या कोव्हिड-१९ ची लागण झाली असून, ती क्वारंटाईन आहे. अशा परिस्थितीत तिने ‘बेबो’साठी खास भेट पाठवली आहे, पण याआधी दोघींमध्ये व्हॉट्सॲपवर चॅटिंग झाली होती. हीच चॅटिंग आता  करीनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रियाचे करीनावर प्रेम
करीनाने (Kareena Kapoor) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट स्टोरीवर रियासोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हे शेअर करत करीनाने “मला हे संभाषण आवडते,” असे कॅप्शन दिले आहे. स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, रियाने बोलणे सुरू केले आणि लिहिले, “मी तुम्हाला क्रीमसह हॉट चॉकलेट पाठवते?” यावर उत्तर देताना करीना लिहिते की, “नाही-नाही, मला ते आवडत नाही.” यानंतर, रिया तिला विचारते, “आणखी पर्याय, हॉट फज सॉस आणि व्हॅनिला आईस्क्रीम?” मग करीना “सहमत आहे आणि होय हे चांगले आहे,” असे लिहिते. यावर रियाने लिहिले की, “ठीक आहे, मी बिस्किटे आणि हॉट फज पाठवते, व्हॅनिला आईस्क्रीम ऑर्डर करते.”

Kareena Kapoor
Photo Courtesy Instagramrheakapoor

यापूर्वीही करीनाला पाठवण्यात आले होते चॉकलेट
अलीकडेच डिसेंबरमध्ये करीनाला कोव्हिड-१९ ची लागण झाली होती. त्यावेळी रिया (Rhea Kapoor) आणि तिची आई सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांनी बेबोला चॉकलेट पाठवले होते. करीनाने याचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून आनंद व्यक्त केला होता. करीनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रिया पॉझिटिव्ह आली.

अलीकडेच, रियाने ती आणि तिचा नवरा करण बुलानी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह असल्याची माहिती देताना लिहिले की, “एखाद्याच्या आरोग्याविषयीची माहिती गॉसिप नसावी, ती फक्त सरकार आणि वैद्यकीय माहितीसाठी असावी.”

करीना कपूरही खाऊ घालण्यात मागे नाही.
त्याचवेळी, नवीन वर्षाच्या निमित्ताने करीना कपूरने एक मजेदार अभिव्यक्तीसह स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. नवीन वर्षात हेल्दी फूड खा, परंतु मनापासून वाटत ते खा, असे तिने कॅप्शन लिहिले आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा