Tuesday, July 9, 2024

प्रसिद्ध अभिनेत्रीवर खिसा मारल्याचा आरोप! डस्टबिनमध्ये बॅग फेकताना झाली अटक

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता (Roopa Dutta) हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, रूपा दत्ताला पोलिसांनी खिसा मारल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यात बॅग टाकताना पाहिले होते. त्यानंतर महिलेला संशयाच्या आधारे पकडण्यात आले. नंतर हे प्रकरण समोर आले. ही घटना कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याची आहे. विधान नगर उत्तर पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एक महिला डस्टबिनमध्ये बॅग टाकत असताना हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी कचऱ्यात फेकताना पाहिली होती बॅग
त्यानंतर पोलिसांनी महिलेला पाहिले. संशय आल्याने महिलेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासात महिलेसोबत बरीच रोकड पकडल्याचे समोर आले आहे. यानंतर महिलेची चौकशी करण्यात आली. बॅगची झडती घेतली असता पोलिसांना आणखी अनेक पाकिटे सापडली. या बातमीने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे की, एवढी लोकप्रिय अभिनेत्री असे कसे काय करू शकते?

तपासात महिलेने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. जत्रा, कार्यक्रम आणि माणसांची गर्दी असलेल्या ठिकाणी ती महिलांचा खिसा मारते. अशा स्थितीत ही महिला आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यातही पोहोचली जिथे तिला हे कृत्य करताना पकडण्यात आले.

७५ हजारांची रोकड करण्यात आली जप्त
माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीकडून जवळपास ७५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. रूपा दत्ता तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी रुपा दत्ताने प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवरही लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिने अनुरागवर फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

त्याचवेळी, अनुराग कश्यपने त्याच्यावरील सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले होते. आपल्या वकिलामार्फत जारी केलेल्या निवेदनात कश्यपने असेही म्हटले आहे की, “मी टू मोहीमेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या चळवळीचा वापर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी केला आहे.”

रूपा दत्ता ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती अनेकदा मोठ्या कार्यक्रमांचा भाग असायची. अभिनेत्रीकडून एक डायरीही सापडली असून, त्यात आतापर्यंतच्या सर्व रकमेचा हिशोब नोंदवला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ती हे सर्व का करत होती हे लवकरच कळेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा