टीव्हीवर अनेक शो आहेत, त्यातील सर्वच प्रसिद्ध होतात असे नाही. मात्र, यामध्ये असे काही शो असतात, जे प्रेक्षकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध होतात. त्यातीलच एक शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. तसा ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त रियॅलिटी शो म्हणूनही ओळखला जातो. या शोचे आतापर्यंत १४ पर्व झाले आहेत. तसेच १५ वा पर्वही काही दिवसातच टीव्हीवर येणार आहे. मात्र, १४ व्या पर्वाला संपून अनेक महिने उलटल्यानंतरही शो अजूनही चर्चेत आहे. विशेष म्हणजे शोची विजेती स्पर्धक आणि अभिनेत्री रुबीना दिलैक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. अशातच नुकतेच तिने ‘बिग बॉस’मध्ये आपला पती अभिनव शुक्लाच्या एव्हिक्शन (बेदखल) बाबत वक्तव्य केले आहे.
फेब्रुवारीत ‘बिग बॉस १४’च्या फिनालेमधून अभिनव शोच्या घरातून बाहेर झाला होता. अभिनवच्या एव्हिक्शन होण्यामागे ते लोक होते, जे ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आले होते. अभिनवच्या एव्हिक्शन प्रक्रियेवर अनेकांनी त्यावेळी टीका केली होती. त्यावेळी जे घडले, त्याबद्दल रुबीनाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने हे सर्व चुकीचे असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टी तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सांगितल्या आहेत. (Actress Rubina Dilaik Biggest Regret of Her Bigg Boss 14 Journey)
रुबीनाने म्हटले की, “मला अनेकदा विचारण्यात आले आहे की, बिग बॉस १४ च्या घरात तुला सर्वाधिक कोणत्या गोष्टीचा खेद आहे? त्यावेळी मी आपल्या विचारांबाबत स्पष्ट नव्हते. तसेच माझ्या भावना वेगळ्या होत्या. प्रत्येकाकडून मिळालेल्या प्रेमामुळे मी भारावून गेले होते. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा वाटते की, अभिनवच्या एव्हिक्शनने मला वाईट पद्धतीने प्रभावित केले.”
रुबीनाने पुढे लिहिले की, “बिग बॉस १४ च्या प्रवासाचे भाग्य कमी सक्षम सदस्यांच्या अशा गटाकडे सोपवण्यात आले होते, जे या शर्यतीत सहभागी नव्हते. तसेच स्पष्टपणे त्यांचे हेतू बरोबर नव्हते आणि मी विरोधही केला नव्हता.”
रुबीनाबद्दल बोलायचं झालं, तर तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘छोटी बहू’ या मालिकेपासून झाली होती. यानंतर तिने अनेक मालिकेत काम केले. त्यात ‘सांस बिना ससुराल’, ”देवों के देव महादेव, ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम
-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी