Saturday, April 12, 2025
Home अन्य उफ्फ! मालदीवमध्ये रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अंदाज, बिकिनीमध्ये केले जबरदस्त फोटो शेअर

उफ्फ! मालदीवमध्ये रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अंदाज, बिकिनीमध्ये केले जबरदस्त फोटो शेअर

कलाकार नेहमीच आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोठे ना कोठे जात असतात. अनेकदा आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली रुबीना दिलैक आजकाल चर्चेचा विषय ठरत आहे. वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस १४’ जिंकल्यापासून चाहते तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक आहेत. आपल्या अभिनयाव्यतिरिक्त तिने आपल्या स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावले आहे.

रुबीना तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांची मने जिंकते. या दिवसांमध्ये ती पती अभिनव शुक्लासह मालदीवला गेली आहे. तिथे ती तिच्या पतीबरोबर वेळ घालवत आहे. तिचा मालदीवला जाण्याचा उद्देश अभिनव शुक्लाचा वाढदिवस साजरा करणे हा होता. रुबीना आणि अभिनव सतत मालदीवमधून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मालदीवमध्ये रुबीनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिची टोन्ड बॉडी आणि गॉर्जियस लूक फ्लॉन्ट करत आहे. फोटोंमध्ये दिसत आहे की, रुबीना पुर्णपणे सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने पिवळ्या रंगाची बिकिनी आणि मल्टीकलर राउंड हॅट आणि स्लिट ग्रे स्कर्ट घातला आहे. यात ती कातील अंदाजात पोझ देताना दिसत आहे. रुबीनाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

रुबीनाने बीचवर बिकिनी परिधान करून कँडीड पोझ दिल्या आहेत. गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये ती जबरदस्त आणि आकर्षक दिसत आहे. रुबीना फोटोंमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. रुबीनाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचे भान हरवून टाकत आहे.

रुबीना आणि अभिनव यांनी एकत्र अनेक फोटो शेअर केले आहेत. मालदीवमध्ये रुबीना आणि अभिनवचे अप्रतिम स्वागत झाले. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने बेडवर केलेली सजावट दाखवली आहे.

यापूर्वी रुबीनाने थाई हाय स्लिट फ्लोरल मॅक्सी ड्रेसमधील फोटो शेअर केले होते. या आउटफिटमध्ये रुबीना परफेक्ट बीच लूकमध्ये दिसली. रुबीनाला कॉम्पलिमेंट म्हणून अभिनवने निळ्या रंगाचा फ्लोरल शर्ट परिधान केला होता.

रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचं झालं, तिची ‘शक्ती’ ही मालिका ऑफ एयर झाली आहे. शूटिंग संपल्यानंतर अभिनेत्री सुट्टीवर गेली आहे. मालदीवपूर्वी रुबीना पती आणि मित्रांसोबत केरळला गेली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा