Thursday, August 7, 2025
Home अन्य बोल्ड एँड ब्युटीफुल! काळ्या रंगाची बिकिनी घालून रुबीनाने समुद्रामध्ये केले फोटोशूट, हार्ट इमोजीचा पडतोय पाऊस

बोल्ड एँड ब्युटीफुल! काळ्या रंगाची बिकिनी घालून रुबीनाने समुद्रामध्ये केले फोटोशूट, हार्ट इमोजीचा पडतोय पाऊस

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस १४’ ची विजेती स्पर्धक आणि अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. बिग बॉसच्या घरात तिचा हटके अंदाज, टास्क खेळण्याची पद्धत आणि लोकप्रियता त्यामुळे तिने हा शो जिंकला आहे. आधीपासून मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या रुबीनाला बिग बॉसमध्ये खूप पसंती मिळाली. तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला होता. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील होता. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम सर्वांनी पाहिले आहे. या शोनंतर रुबीना खूप चर्चेत आली होती. तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

रुबीनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. ती समुद्रामध्ये उभी राहून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसेच तिच्या आजूबाजूचे वातावरण देखील खूप सुंदर दिसत आहे. रुबीना सध्या मालदीवमध्ये सुट्या एन्जॉय करत आहेत. तेथील हे फोटो तिने शेअर केले आहेत. (Actress Rubina dilaik share her black bikini photos on social media)

तिचा हा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट केली आहे. तिच्या या फोटोला तीन लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती : आस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावां’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाची ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ ही गाणी प्रदर्शित झाली होती‌.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

हे देखील वाचा