Friday, July 12, 2024

काळी लिपस्टिक आणि चेहऱ्यावरील आर्ट, रुबीना दिलैकचा नवा लूक पाहून चाहतेही चक्रावले

‘बिग बॉस १४’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा घेऊन ती त्याचा संधीचे सोने करताना दिसली आहे. आतापर्यंत तिला मिळालेल्या विजयाची झलक आपण सोशल मीडियावर पहिलच आहे. तिचा आकर्षक करणारा लूक देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत असतो. तिचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे नवीन फोटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या फोटोमधील तिचा लूक चाहत्यांना भुरळ घालणारा आहे.

रुबीनाने (rubina dilaik) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने चेहऱ्यावर आर्ट केले आहे. तिच्या या मेकओव्हरमधील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तिने काळ्या रंगाची लिपस्टिक लावली आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूप आकर्षक दिसत आहे. तिची स्टाईल आणि फॅशन सेन्स अनेकांना आवडला आहे. (actress rubina dilaik share her new photo on social media)

तिच्या अनेक चाहत्यांना हा स्टायलिश लूक आवडला आहे. अनेकजण तिच्या या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. याआधी देखील तिचे अनेक ग्लॅमरस फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती : आस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा