Friday, August 8, 2025
Home मराठी ‘गोठ’ फेम अभिनेत्रीने गुपचूप थाटला संसार! लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल

‘गोठ’ फेम अभिनेत्रीने गुपचूप थाटला संसार! लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल

गोठ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुपल नंद नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने फार गाजावाजा न करता गुपचूक लग्न उरकले असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या नवऱ्याचे नाव अनिश कानविंदे आहे.

तिच्या लग्नासाठी अभिनेता यशोमन आपटे देखील उपस्थित होता. त्यानेच सोशल मीडियावर तिच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे.

Rupal-Nand-Yashoman-Apte
Photo Courtesy: Instagram/apt_yashomaan

रुपलने गोठ व्यतिरिक्तही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती आणि यशोमन यांनी आनंदी हे जग सारे आणि श्रीमंताघरची सून या मालिकांमध्ये एकत्र काम केलंय. रुपल मुंबई-पुणे-मुंबई ३ चित्रपटातही दिसली होती.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा