दिवाळी म्हटले की, फटाके, दिवे, आकाश कंदील, रांगोळी नवीन कपडे या सगळ्या गोष्टी ओघाने येतातच. परंतु यात आणखी एक गोष्ट अशी असते, जिच्याशिवाय आपली दिवाळी अपूर्ण असते. ती गोष्टी म्हणजे दिवाळीचा फराळ. या सणात कुटुंबाने एकत्र मिळून फराळ करणे आणि खाणे काही वेगळाच आनंद असतो. अनेकजण सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच ‘आई कुठे काय करते’ फेम ‘संजना’ म्हणजेच रुपाली भोसलेने काही हटके अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
रुपालीने घरात करंज्या बनवतानाचा व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, रुपाली दिवाळीचा फराळ करताना दिसत आहे. सुरुवातीला ती करंज्या तयार करते आणि नंतर तळते. याआधी ती बेसनाचे लाडू करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. (Actress rupali bhosale share a video while making ladu and karnji, give best wishes of diwali)
तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिला प्रश्न विचारते होते. खास गोष्ट म्हणजे रुपालीने देखील या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. तिचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉस मराठीने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे ‘संजना’ नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे तरी देखील तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. या मालिकेत सध्या अनेक वळणं पाहायला मिळत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा
–तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी
–लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ