सोशल मीडिया हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी कलाकार नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यात ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिचे अनेक ग्लॅमरस तसेच पारंपारिक लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
ऋतुजाने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अगदी ती परीसारखी दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा टॉप आणि स्कर्ट घातला आहे. तसेच कानात ईअरिंग घातले आहे. ती कोणत्या तरी बागेत फोटोशूट करत आहे. या सोबत तिने या ड्रेसवरील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (Actress Rutuja bagwe share her beautiful photo on social media)
तिचा हा फोटो आणि व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे. अनेक कलाकार देखील तिच्या या फोटोवर कमेंट करत आहे. अभिनेत्री अश्विनी केसकर हिने “लव्हर” अशी कमेंट केली आहे. आशुतोष गोखले याने “मस्त खूप छान ऋतू” अशी कमेंट केली आहे. तसेच रसिका सुनील हिने “सुंदर ड्रेस, छान दिसतोय तुला” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.
ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.
यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…