Saturday, July 6, 2024

अभिनेत्री ऋतुजा बागवेने नवीन फोटो केला शेअर; सुंदरता पाहून चाहताही म्हणाला, ‘छान किती दिसते फुलपाखरू’

सोशल मीडिया हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी कलाकार नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यात ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिचे अनेक ग्लॅमरस तसेच पारंपारिक लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

ऋतुजाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाचा लेहंगा टॉप घातला आहे. तसेच यावर तिने नेटची ओढणी घेतली आहे. यासोबत तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. तसेच कानात आकाशी रंगाचे झुमके घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress Rutuja bagwe share her photo on her official Instagram account)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा तुमचा आत्मा हसतो, तेव्हा तुमचा दिवस परिपूर्ण झालेला असतो.” तिच्या हा फोटोवर अन्विता फलटणकर आणि अश्विनी केसकर यांनी हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच तिचे बाकी चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “छान किती दिसते फुलपाखरू,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “अती सुंदर,” अशी कमेंट केली आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड

-‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज

-तुटलेलं नातं पुन्हा जुळणार? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारने मारली स्नेहाला मिठी

हे देखील वाचा