संपूर्ण भारतात गुरुवारी (७ ऑक्टोबर) घटस्थापना झाली. यावर्षी कोरोनाचे सावंत असूनही नवरात्रीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. स्त्री-शक्तीचा आदर आणि जागर करण्यासाठी नवरात्र हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होतो. जसे या नवरात्रीतील नऊ दिवसांचे एक महत्व आहे तसेच या प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रंगाचे महत्व आहे. अशातच यावर्षी पहिला दिवस पिवळ्या रंगाचा आहे. आनंदाची उधळण करणारा आणि आशेचा किरण दाखवणारा हा रंग नेहमीच सर्वाना ऊर्जा देऊन जातो. देवीच्या प्रत्येक रुपाला दिवसाच्या रंगाप्रमाणे वस्त्र घातले जातात. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देखील हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. अनेक अभिनेत्रींनी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून फोटो शेअर केले आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने देखील पिवळ्या रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
ऋतुजाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋतुजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तसेच यावर तिने जांभळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. यावर तिने मराठमोळा साजशृंगार केलेला दिसत आहे. गळ्यात साज, हातात बांगड्या, कपाळी चंद्रकोर, केसात गजरा या सगळ्या साजशृंगारत ती खूपच सुंदर दिसत आहे. ( Actress Rutuja bagwe share her yellow colour saree photos on social media)
हे सुंदर फोटो शेअर करून अभिनेत्रीने सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. या आधी देखील तिने साडीमधील तिचे कितीतरी फोटो शेअर केले आहेत. परंतु पिवळ्या रंगाच्या साडीमधील गोष्टच काही निराळी आहे. हा रंग ऋतुजाला अगदी खुलून दिसत आहे.
ऋतुजा बागवे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. खास करून तिने टेलिव्हिजनवरील संस्कारी मुलीची पात्रं निभावली आहेत. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘मंगळसूत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘तू माझा सांगाती’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस
-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’