भोजपुरी चित्रपटसृष्टी झपाट्याने भरारी घेताना दिसत आहे. भोजपुरीतील चित्रपटांव्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओ सतत प्रदर्शित होताना दिसतात. प्रेक्षकांच्या ओठांवर सहज रूळणारे शब्द या गाण्यांमध्ये पाहायला मिळतात. भोजपुरी चित्रपट आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार अभिनय कौशल्याचा प्रसार करणारी सुंदर अभिनेत्री सहर अफशा तिच्या बोल्ड अभिनय आणि क्यूट स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सहर अफशा तिच्या प्रत्येक अदाकारीने चाहत्यांना वेड लावते. यामुळेच सहर अफशाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला तिच्या साधेपणाबरोबरच तिच्या धाडसामुळेही पसंत केले जाते.
सहरने भोजपुरी चित्रपट उद्योगात तसेच हिंदी आणि दक्षिण उद्योगात खूप नाव कमावले आहे. सहरने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत राहते. चाहत्यांना तिची गाणी खूप आवडतात. तिची गाणी यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहेत. अलीकडेच, सहरचे असेच एक गाणे यूट्यूबवर व्हायरल होण्याबरोबरच व्ह्यूजचे रेकॉर्ड तोडत आहे. चाहते प्रतिक्रिया देत गाण्याचे संगीत आणि अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत.
भोजपुरी इंडस्ट्रीचा पॉवरस्टार आणि दमदार गायक पवन सिंग या गाण्यात सहरसोबत दिसत आहे. दोघांचे हे गाणे ‘घातक’ चित्रपटातील असून गाण्याचे नाव ‘तोहरी सुरतिया’ आहे. या गाण्यात दोघांमध्ये खूप रोमान्स दिसत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच आवडली आहे. सहरचा बोल्ड अंदाज आणि पवन सिंगचा रोमँटिक अंदाज गाण्यात प्रेक्षकांना आवडत आहे. दोघांच्या या गाण्याला आतापर्यंत ८ मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे या वर्षीच्या सुरुवातीला प्रदर्शित झाले होते, परंतु ते आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे.
हे गाणे स्वतः पवन सिंगने गायले आहे. गाण्याचे बोल प्रकाश यांनी लिहिले आहेत, तर गाण्याचे संगीत छोटे बाबा यांनी दिले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद
-Bigg Boss Marathi 3: ‘राम राज्य येईल बिग बॉस, तुम्ही…’, विकास पाटीलने भावना केल्या व्यक्त