दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र आनंदी-आनंद पसरला आहे. मनोरंजन क्षेत्रात देखील दिवाळी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री सई लोकूर हिने तिचा पती तीर्थदीप रॉयसोबत सोशल मीडियावर त्यांच्या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत. सई आणि तीर्थदीपने याच वर्षी लग्न केले आहे. त्यामुळे लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिवाळसण आहे. ज्याचा ते भरभरून आनंद घेताना दिसत आहे.
सईने सोशल मीडियावर त्यांचे दिवाळीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही खूप खुश दिसत आहेत. फोटोमध्ये सईने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. यासोबत तिने गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. तसेच हातावर मेहेंदी आणि हिरवा चुडा घातला आहे. तीर्थदीपने देखील कुर्ता घातला आहे. त्यांनी त्यांच्या घराला रोशनाई केली आहे. सोबतच आकाश कंदील लावला आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ते फुलबाजा पेटवताना दिसत आहेत, तर आणखी एका फोटोत ते त्यांच्या कुत्र्याला घेऊन पोझ देत आहेत. (Actress sai lokur celebrate diwali with her husband )
त्यांचे हे पहिल्या दिवाळीचे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेक चाहते त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. तसेच या आधी तिने रांगोळी काढताना देखील व्हिडिओ शेअर केला होता.
सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लीज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस मराठी २’ या पर्वामध्ये स्पर्धक होती. त्यावेळी तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा
-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी
-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास










