मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजासाठी चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकापासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेतपर्यंत तिने पात्र निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. तिने आता देखील एक फोटो पोस्ट केला आहे, पण हा फोटो तिचा नसून फेसबुकच्या एका पोस्टचा स्क्रीनशॉट आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
सई ताम्हणकरने अमोल उदगीरकर याच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, “मी सांगलीला एका शॉर्ट फिल्म फेस्टिवलला गेलो होतो. तिथे माझ्यासोबत एक स्थानिक मुलगा होता फिरायला. त्याला मी विचारलं की, सांगलीमध्ये काय आहे बघण्यासारखं? तर तो मला एका घरासमोर घेऊन गेला आणि अभिमानाने सांगितलं की, हे सई ताम्हणकरचं घर आहे. मराठी सिनेमाविषयक चर्चा ऐकल्या की, मला सगळ्यात आधी तो पोरगा आठवतो.”
सई ताम्हणकरने हा स्क्रीन शॉर्ट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून लिहिले आहे की, “मी कृतज्ञ आहे, आणि हा सांगलीमध्ये बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.” सई ताम्हणकरच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत.
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबतच टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. सोबत तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोना जाईना! ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला आठवतायत महामारीच्या पूर्वीचे दिवस, फोटो शेअर करत म्हणाली…
-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…