Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

कोरोना काळापासून चित्रपट सृष्टीने अनेक कलाकार गमावले आहेत. यामध्ये अभिनयात मोठी कारकीर्द केलेले कलाकार जास्त निखळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणता कलाकार आजारी असल्याची जरी माहिती मिळाली, तरी नेटकरी त्यावरून वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात करतात. अशात ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांच्या संदर्भात एक अफवा पसरवण्यात आली होती.

सायरा बानो या दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पतीच्या निधनाने त्या पूर्ण खचून गेल्या आहेत. त्यामुळे त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना ऍंजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्या खूप घाबरलेल्या आहेत आणि त्यांनी अँजिओग्राफी साठी नकार दिला आहे, अशा पद्धतीच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरवल्या गेल्या होत्या. परंतु हे सर्व खोटं असल्याचा खुलासा सायरा बानो यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी केला आहे. (Actress Saira Banu not battling with depression nether she is not avoid angiography and she is feeling well)

सायरा बानो यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर नितीन गोखले यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “त्यांनी ऍंजिओग्राफीला अजिबात नकार दिलेला नाही. तसेच त्या कोणत्याही प्रकारच्या नैराश्यात सध्यातरी नाहीत. त्यांचा मधुमेह जास्त असल्याने, तो आटोक्यात येईपर्यंत आम्ही त्यांची ऍंजिओग्राफी पुढे ढकलली होती. यामध्ये त्यांनी कुठलाही नकार देण्याचा प्रश्नच येत नाही.” पुढे डॉक्टर असेही म्हणाले की, “सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. त्यांना आता आयसीयूमधून बाहेर ही काढण्यात आले आहे. लवकरच आम्ही त्यांना घरी पाठवू आणि काही दिवसांनी ऍंजिओग्राफीसाठी पुन्हा बोलवू.”

खरंतर फैजल फारुकीने सांगितल्याप्रमाणे, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो खूप खचून गेल्या आहेत. त्यांच्या तब्येतीची माहिती फैजल यांनीच प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यामुळे अनेक चाहत्यांची सायरा बानो यांच्या विषयीची चिंता वाढली. तसेच त्यांनी ऍंजिओग्राफीला नकार दिला असल्याचे काही चाहत्यांना वाटू लागले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-TMKOC: जेठालाल झाला गंभीर जखमी, तर ‘यामुळे’ पोलिसांना करावी लागली गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक

-अरेरे! प्रार्थना अन् मायराच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? नेटकऱ्यांचाही उमटतायेत प्रतिक्रिया

-‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…

हे देखील वाचा