Tuesday, October 14, 2025
Home साऊथ सिनेमा ‘का नेहमी स्त्रियांवरच…?’ नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समंथाने शेअर केली पोस्ट

‘का नेहमी स्त्रियांवरच…?’ नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समंथाने शेअर केली पोस्ट

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा आजकाल तिच्या घटस्फोटामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. तिने अलीकडेच नागा चैतन्यसोबत विभक्त होण्याची माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. नागा आणि समंथा विभक्त झाल्यानंतर चाहत्यांचे हृदय तुटले आहे. दरम्यान समंथा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकतीच एक पॉवरफुल पोस्ट शेअर केली आहे. नागापासून विभक्त झाल्याची माहिती दिल्यापासून तिला सतत ट्रोल केले जात आहे. त्यामुळेच आता तिने पोस्ट शेअर करून ट्रोलर्सला योग्य उत्तर दिले आहे.

‘स्त्रियांवरच का उपस्थित केले जातात प्रश्न?’
समंथा महिला आणि पुरुषांबाबत दुहेरी भूमिका ठेवणाऱ्या लोकांबद्दल बोलली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करताना तिने लिहिले की, “गुड मॉर्निंग, जेव्हा स्त्रियांचा प्रश्न असतो, त्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले जातात. पण एक समाज म्हणून आपण पुरुषांच्या नैतिकतेवर प्रश्न विचारत नाही, म्हणूनच आपण मौलिक आणि नैतिक समाज नाही.”

Photo Courtesy: Instagram/samantharuthprabhuoffl

साल २०१७ मध्ये झाले होते लग्न
एकमेकांच्या जवळ आलेल्या समंथा प्रभू आणि नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. दोघांमध्ये सर्व काही खूप चांगले होते. समंथा बऱ्याचदा नागासोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. पण काही काळापूर्वी त्यांनी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा करून त्यांच्या चाहत्यांची मने पूर्णपणे तोडली.

सोशल मीडियावर दिली विभक्त झाल्याची माहिती
समंथा आणि नागा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. ३ ऑक्टोबर रोजी दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात लिहिले होते की, “बऱ्याच विचार विनिमयानंतर मी आणि नागा यांनी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे खूप भाग्यवान आहोत की, मैत्री हा एक दशकाहून अधिक काळ आमच्या नात्याचा मुख्य भाग होता, आम्हाला खात्री आहे की, आमच्यामध्ये एक खास बंधन कायम राहील.”

https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link

अशा प्रकारे मिळाला इशारा
समंथा आणि नागा चैतन्य यांच्यातील संबंधांमध्ये सर्व काही बरोबर नाही की, हे चाहत्यांना समंथाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून इशारे मिळाले. समंथाने काही काळापूर्वी अचानक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अक्किनेनी काढून टाकले आणि रुथ प्रभू तिच्या नावाच्या पुढे लावले. त्यानंतर तिच्या आणि नागा चैतन्याच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

या वर्षी ६ ऑक्टोबर रोजी, समंथा आणि नागा त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करणार होते. परंतु त्यापूर्वी दोघे कायमचे वेगळे झाले. दोघेही साऊथ सिनेमाचे मोठे स्टार आहेत. ‘द फॅमिली मॅन २’ नंतर समंथा लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा