साऊथ इंडस्ट्रीत अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. त्या अभिनेत्रींमध्ये समंथा रुथ प्रभू हिच्या नावाचाही समावेश होतो. समंथा सध्या भलतीच चर्चेत आहे. तिच्या चर्चेत येण्यामागील कारण आहे तिचा आगामी सिनेमा. ती ‘शाकुंतलम’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. सध्या ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान समंथाला अश्रू अनावर झाले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
काय म्हणाली समंथा?
समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाली की, अलीकडच्या संघर्षाच्या काळातही सिनेमासाठी तिचे प्रेम जराही कमी झाले नाहीये. यावेळी ती असेही म्हणाली की, या कार्यक्रमात ती हिंमत एकवटून सहभागी झाली आहे.
कार्यक्रमादरम्यान समंथा भावूक
या कार्यक्रमादरम्यान जेव्हा दिग्दर्शक गुनाशेखर बोलत होते, त्यावेळी अभिनेत्री भावूक झाली. यादरम्यान ती तिचे अश्रू रोखू शकली नाही. कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत समंथा रडताना दिसत आहे. तसेच, अश्रू पुसत हसण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, चाहते अभिनेत्रीच्या बाजूने उभे राहिले आहेत. एका युजरने ही क्लिप शेअर करत लिहिले आहे की, “आम्ही तुमच्यासोबत आहोत.” तसेच, इतर युजर्सनी तिला हिंमत देत आहेत.
We're with you sam ???????? be strong@Samanthaprabhu2#SamanthaRuthPrabhupic.twitter.com/sDjC9r9dBR
— Jegan Sam ♡ (@JeganSammu) January 9, 2023
समंथा आजाराशी देतेय झुंज
समंथा कार्यक्रमादरम्यान म्हणाली की, “आयुष्यात मी कितीही संघर्ष करत राहिले, तरीही एक गोष्ट बदलणार नाही, ती आहे सिनेमासाठीचे माझे प्रेम. माझा दृढ विश्वास आहे की, शाकुंतलमसोबत हे प्रेम अनेक पटींनी वाढेल.” यादरम्यान तिने सिनेमात संधी दिल्याबद्दल गुनाशेखर यांना धन्यवादही दिला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात समंथाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून खुलासा केला होता की, ती ‘मायोसायटिस’ नावाच्या दुर्मिळ स्वयं-प्रतिकार आजाराने ग्रस्त आहे. तिने सांगितले होते की, जीवाला धोका होईल इतक्या स्टेजवर हा आजार नाहीये.
शांकुतलम (Shaakuntalam) सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर हा सिनेमा हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत 17 फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक गुनाशेखरसोबत समंथाचा पहिलाच सिनेमा आहे. (actress samantha ruth prabhu breaks down in shaakuntalam trailer launch event video goes to viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्वास रोखून धरा! वादात सापडलेल्या ‘पठाण’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज, काय असेल सिनेमात खास?
जाळ अन् धूर संगटच! प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला बोल्ड अंदाज, नेटकरीही म्हणाले, ‘तुमचे *** पाहून मन…’