दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका जोडप्याने मोठा निर्णय घेत त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. ते जोडपे इतर कोणी नसून समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य अक्किनेनी होय. या दोघांनीही काही दिवसांपूर्वीच आपला ४ वर्षांचा सुखी संसार मोडत घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाचा चाहत्यांना झटका बसला आहे. समंथाने घटस्फोटानंतर सोशल मीडियावर पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जुने प्रेम, पर्वत, थंड हवेबद्दल वक्तव्य केले आहे. समंथाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
समंथा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर समंथाने सोशल मीडियावरून थोडा ब्रेक घेतला होता. असे असले, तरीही तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुनरागमन केले आहे. नुकतेच तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत समंथा खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोसोबतच तिने आपल्या मनातील गोष्टही सांगितली आहे. (Actress Samantha Ruth Prabhu Shares First Post After Annoucing Separation From Naga Chaitanya)
समंथाने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने केसात गुलाबी रंगाचे फूलही लावले आहेत. फोटोत समंथा पांढऱ्या रंगाच्या चादरीवर चालताना दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जुन्या प्रेमाची गाणी- पर्वत आणि खडकांवर वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, हरवलेल्या आणि सापडलेल्या प्रतिमांची गाणी. दरीतील दुःखाचे प्रतिध्वनी आणि जुन्या प्रेमींची गाणी. जुन्या बंगल्यांमध्ये, पायऱ्या आणि रस्त्यावर वाऱ्याचा आवाज.”
समंथाने आपल्या घटस्फोटानंतर ही पहिलीच पोस्ट आहे. समंथाच्या या पोस्टला चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे. चाहते समंथाच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत होते. अशामध्ये तिच्या या पोस्टने चाहत्यांनाही आनंदी केले आहे. समंथाच्या या पोस्टला आतापर्यंत १८ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर ९ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्सचा वर्षावही झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘त्या’ व्हिडिओत सलमानने दिलेले वचन केले पूर्ण; शाहरुख संकटात असताना धावला त्याच्या मदतीला
-“तो तुझा बाप होता”, म्हणत अनुपम खेर यांच्या आईने त्यांना फटकारले
-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’