दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची तर चर्चा नेहमीच चर्चा पाहायला मिळते. मात्र समंथा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी नेहमीच सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. तिचा प्रत्येक फोटो आणि लूक चाहत्यांना भुरळ घालत असतो. मात्र अलिकडेच तिच्या एका कार्यक्रमातील लूकने आणि ड्रेसने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. यावर समंथानेही सडेतोड उत्तर दिले आहे. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ.
समंथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. समंथाच्या कसदार अभिनयासोबतच ती आपल्या मनमोहक सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. आपले बोल्ड फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच समंथाने घातलेल्या एका ड्रेसवरुन तिला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. याबद्दल समंथाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा सगळा प्रकार मुंबईमधील क्रिटिक्स चॉइस चित्रपट महोत्सवादरम्यान घडला आहे. ज्यामधील काही फोटो समंथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.ज्यामध्ये तिच्या ड्रेसवरुन तिला नेटकऱ्यांनी असभ्य टीकेला सामोरे जावे लागले होते. याबद्दल तिने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपला राग व्यक्त करताना समंथा म्हणते की, “एक स्त्री असल्याने मला पहिली शिक्षा मिळाली की टीकेला सामोरे जाणे काय असते हे समजले. तीच्या रंगावरुन, शिक्षणावरुन अशा प्रत्येक बाबींवरुन तिला धारेवर धरले जाते. महिलांना कपड्यांंवरुन बोलणे खूप सोपे असते. जे तुम्ही करत आहात.”
याबद्दल पुढे बोलताना समंथा म्हणते की “आता आपण २१व्या शतकात असूनही महिलांना अशा प्रकारावर चुकीचे ठरवणे बंद करणार आहोत का? आता तरी आपण सुधारणा करण्यास सुरूवात करणार आहोत का? असे चांगले विचार आधी स्वतःमध्ये बदल करण्यात वापरा, आपले विचार दुसऱ्यावर लादून कोणाचेही भले होत नाही.” अशा स्पष्ट शब्दात समंथाने टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले आहे. सध्या तिच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे. दरम्यान समंथाच्या या व्हायरल लूकला अनेक दिग्गज कलाकारांनी पसंती दर्शवली आहे.
हेही वाचा –