Wednesday, April 16, 2025
Home मराठी ‘ये चाँद सा रोशन चेहरा’, समृद्धी केळकरच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

‘ये चाँद सा रोशन चेहरा’, समृद्धी केळकरच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या ट्रेडिंग आहेत. प्रत्येक मालिकेचे कथानक उत्कृष्ट आहे, पण या सगळ्या मालिकांमध्ये एक मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे, ती मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही होय. या मालिकेची कहाणी, शीर्षकगीत, पात्र, डायलॉग सगळ्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. डोळ्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली एक सर्वसामान्य घरातील मुलगी. मात्र, संसाराचा‌ गाडा ओढताना ती तिच्या स्वप्नाचा त्याग करते. परंतु या सगळ्यात तिचा जोडीदार म्हणजे तिचा पती कसा नव्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारी देतो. ही कहाणी या मालिकेतून दाखवली आहे.

या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री समृद्धी केळकरने तिच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. तिचे पात्र चांगलेच गाजत आहे. तिच्या सालस स्वभावाने, अभ्यासू वृत्तीने आणि मनमिळावू स्वभावाने सगळ्यांचे प्रेम मिळवले आहे. समृद्धी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. (Actress Samruddhi Kelkar share her photos on social media)

समृद्धीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पीच कलरची एक सुंदर फ्लोरल साडी नेसली आहे. तसेच साडीला मॅचिंग असा डिझायनर ब्लाऊज घातला आहे. तसेच तिने केसांची पोनीटेल घालून कानात सुंदर ईअरिंग घातले आहेत. तिने हातात सुंदर चंदेरी रंगाची पर्स घेतलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिने पारंपारिक तसेच वेस्टर्न असा पेहराव केला आहे.

तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमधील शुभम म्हणजे हर्षद अटकरीसोबत दिसत आहे. ते दोघेही ‘मी होणार सुपरस्टार’ या शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. तेथील त्यांची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनेहरा.” आणखी एका चाहत्याने “खूप गोड,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी इतर चाहते देखील तिच्या या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत समृद्धीसोबत अभिनेता हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत आहे. हर्षदने या आधी ‘दुर्वा’, ‘अंजली’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. तसेच समृध्दीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले आहे. त्यांची ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमधील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये देखील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

हे देखील वाचा