Saturday, July 6, 2024

‘झुमका गिरा रे!’ प्रसिद्ध गाण्यावर संदीपा धरने लावला आपल्या हॉटनेसचा तडका

बॉलिवूड अभिनेत्री संदीपा धर अभिनयासोबतच, तिच्या उत्कृष्ट डान्स कौशल्यासाठीही ओळखली जाते. तिचे डान्स व्हिडिओ दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. संदीपा धरने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘झुमका बरेली वाला’ गाण्यावर आपल्या अदा दाखवताना दिसत आहे. संदीपाचा हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

संदीपाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाच्या साडीसोबत रंगबेरंगी ब्लाउज परिधान केले आहे, ज्यामध्ये ती बरीच हॉट दिसत आहे. ‘झुमका बरेली वाला’ गाण्यावर तिच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. यात अभिनेत्री आपले टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसली आहे. व्हिडिओमध्ये संदीपा चालताना दिसत आहे. तिचा चालण्याचा अंदाज आणि तिची स्माईल चाहत्यांना वेड लावायला पुरेशी आहे.

या व्हिडिओच्या खाली नेटकऱ्यांनी कौतुकांचे पूल बांधलेले पाहायला मिळत आहेत. चाहते कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजीचा पाऊस पाडत आहेत. तसेच खूप कमी वेळात या व्हिडिओवर ७८ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहत्यांच्या पसंतीमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संदीपा धरने तिच्या कारकीर्दीची सुरूवात २०१० मध्ये, राजश्री प्रॉडक्शनच्या ‘इसी लाईफ में’ या चित्रपटापासून केली होती. संदीपासोबत अशोक ओबेरॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी बरेच कौतुक केले. याशिवाय तिला या चित्रपटासाठी स्टारडस्ट, फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड्स ही नामांकनेही मिळाली. यानंतर ती सलमान खान अभिनित ‘दबंग २’ या चित्रपटात दिसली. टायगर श्रॉफचा पदार्पण चित्रपट ‘हीरोपंती’ मध्येही संदीपाने काम केले आहे. यात तिने क्रिती सेननच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा