‘दिल बेचारा’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संजना सांघी. एकाच चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. संजना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तसेच फॅन फॉलोविंग देखील मोठ्या संख्येने असल्याकारणाने तिच्या फोटोला खूप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात.
संजनाने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने तिने आपल्या चाहत्यांना ‘क्लीन बोल्ड’ केले आहे. चाहत्यांकडूनही तिच्या या फोटोला भरभरून पसंती मिळत आहे. या फोटोमध्ये तिने क्रीम कलरचा एक फिट शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिने लिफ्टमध्ये तिचे हे फोटोशूट केले आहे. अशा वेगळ्या पद्धतीने शूट करणारी संजना ही बॉलिवूडमधील बहुधा पहिलीच अभिनेत्री असावी.
तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘लिफ्टमध्ये गैरव्यवहार करण्याचा सल्ला दिला जात नाहीये,’ असेही लिहिले आहे.
तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तिचे चाहते या फोटोवर एका पेक्षा एक कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने तर तिला अशी कमेंट केली आहे की, “अरे कोणीतरी अग्निशमन दलाला बोलवा. लिफ्टमध्ये आग लागली आहे. नाही नाही आगंच लिफ्टमध्ये आहे.”
संजनाने मस्तीच्या मुडमध्ये हे फोटो शूट केले आहेत. तसेच तिचे हास्य बघून तिच्यावर फिदा होत आहेत. तिचे हे फोटो फॅशनला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जात आहे. तसेच लाईक्स करून चाहते तिच्यावरचे प्रेम दर्शवत असतात. ती नेहमीच असे वेगवेगळे ड्रेस घालून फोटोशूट करत असते. प्रत्येक वेळेस ती एका वेगळ्याच फॅशनने सगळ्यांसमोर येते.
संजना सांघीने ‘दिल बेचारा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती अभिनेता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या एकाच चित्रपटाने ती खूप हिट झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लॉकडाऊनमुळे बॉलिवूडवर येऊ शकते मोठे संकट, कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
-बापरे! ‘हिरो नंबर १’ गोविंदा सापडला मोठ्या अडचणीत, पत्नीने दिली माहिती