Monday, August 4, 2025
Home टेलिव्हिजन बोल्ड व्हिडिओमध्ये संजीदा शेखने घातला धुमाकूळ, चाहते म्हणाले ‘तू अशर्फी आहेस’

बोल्ड व्हिडिओमध्ये संजीदा शेखने घातला धुमाकूळ, चाहते म्हणाले ‘तू अशर्फी आहेस’

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. आजकाल अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे सर्वत्र चर्चेत आहे. प्रेक्षकांनी तिला नेहमीच शोमध्ये सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पाहिले आहे. अशा परिस्थितीत ती जेव्हा जेव्हा बोल्ड लूकमध्ये दिसली तेव्हा तिला पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. ती अनेकदा तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचवेळी चाहतेही संजीदाच्या लेटेस्ट पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या संजीदा सोशल प्लॅटफॉर्मवर जास्त सक्रिय असल्याचे दिसते. तिच्या पोस्टने चाहत्यांना वेड लावण्याची संधी ती सोडत नाही. दरम्यान, संजीदाचा एक लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

संजीदाने (Sanjeeda Sheikh) इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने स्वतःचे पाच वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हसत-हसताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये ती चहा पिताना दिसत आहे.

‘असे’ ड्रेस संजीदा शेखने केले परिधान

पहिल्या फोटोत संजीदाने ब्लॅक कलरचा वन पीस ड्रेस परिधान आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिसऱ्या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर चौथ्या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. पाचव्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

संजीदा शेखचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर होतोय व्हायरल

व्हिडिओ शेअर करताना संजीदा शेख यांनी जावेद अलीच्या श्रीवल्ली या गाण्याचे संगीतही वापरले आहे. संजीदाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. त्याला १ तासात ६००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका चहत्याने एक हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर दुसऱ्याने फायर इमोजी शेअर केला आहे. एका चाहत्याने प्रेम लिहिले आहे, तर दुसऱ्याने “तू अशर्फी आहेस” असे लिहिले आहे. तर अनेकांनी क्यूट, बोल्ड आणि अमेझिंग लिहिले आहे.

संजीदा शेख ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक शोमध्येही काम केले आहे. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली आहे. तिच्या भूमिकांना खूप पसंती मिळाली आहे. संजीदा शेखचा नुकताच आमिर अलीपासून घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा