Saturday, July 6, 2024

संस्कृती बालगुडेचे केशरी रंगाच्या ड्रेसमधील रूप पाहून फॅन झाला मोहित, म्हणाला ‘सूर्याच्या छटा पसरल्या’

 

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश प्रकर्षाने केला जातो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने लीलया निभावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर वाढला आहे. अशातच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

संस्कृतीने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने केशरी रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने केवळ कानात ईअरिंग आणि बिंदी लावली आहे तसेच तिने केसांची सुंदर वेणी घातली आहे. या लूकमध्ये ती एकंदरीत खूप सुंदर दिसत आहे. (Actress sanskruti balgude share her photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मैं शर्माती, रोज लगाती, काजळ सुरमा लाली.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने या फोटोवर “लव्ह” अशी कमेंट करून हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तर एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “या पृथ्वीवरील मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्याचे अप्रतिम रूप.” तर आणखी एकाने “सूर्याच्या छटा पसरल्या” अशी कमेंट केली आहे.

संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती.

लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के हे कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा