Thursday, April 24, 2025
Home अन्य तब्बल ९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेला सपनाचा व्हिडिओ होतोय भलताच व्हायरल; पाहा काय म्हणतेय?

तब्बल ९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेला सपनाचा व्हिडिओ होतोय भलताच व्हायरल; पाहा काय म्हणतेय?

आपल्या डान्सच्या जोरावर तरुण मंडळींसह वयस्कर व्यक्तींना थिरकायला भाग पाडणारी अभिनेत्री म्हणजेच हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी होय. तसेच ती आपल्या नवनवीन गाण्यांमुळेही चर्चेत असते. तिचे चाहतेही तिच्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. हीच सपना आपल्या डान्सव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळेही भलतीच चर्चेत असते. नुकताच काही दिवसांपूर्वी तिने आपला एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती आपल्या हृदयाची व्यथा सांगताना दिसत होती. आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सपनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडिओत सपना म्हणताना दिसत आहे की, “प्रेम अपूर्ण असेल तर ते अपूर्णच ठीक, प्रेम जर अपूर्ण असेल, तर ते अपूर्णच ठीक. जर पूर्ण झाले, तर ते झाडू- पोछा करायला लावेल.”

तिच्या या पोस्टला ९ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले होते. त्याचबरोबर ७० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि ६०० पेक्षाही अधिक कमेंट्सचा पाऊस पडला होता. (Actress Sapna Choudhary Funny Video Went Viral On Social Media)

नुकतेच सपना चौधरीचे ‘गुर्शल’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे खूपच भावुक करणारे आहे. यामध्ये एका गरीब मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे.

या गाण्याबाबत सांगताना सपना चौधरीने लिहिले की, “#गुर्शल हे केवळ एक गीत नाहीये, तर कहाणीही आहे. अनेक मुलांची आशा आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला आमचे काम आवडेल, भेटूया लवकरच, नवीन काम, नवीन आशा, नवीन कहाणीसह. प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूद्या.”

सपना चौधरीच्या फॅन फॉलोविंगबाबत बोलायचं झालं, तर सुरुवातीला फक्त हरियाणापुरती मर्यादित राहणारी सपना आता देशातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध आहे. तिच्या फॉलोवर्सची संख्या ही लाखोंमध्ये आहे. जेव्हा केव्हा तिचे नवीन गाणे येते, तेव्हा तिचे चाहत्या या गाण्यावर जीव ओवाळून टाकतात. मागील काही काळापासून ती स्टेज शोपासून दूर आहे. मात्र, ती सातत्याने आपले नवीन म्युझिक अल्बम चाहत्यांसाठी घेऊन येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

हे देखील वाचा