अभिनेत्री सारा अली खान नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिने मोजक्याच चित्रपटात काम केले आहे, परंतु त्यामधून तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती अभिनयासोबतच आपल्या फिटनेसवरही लक्ष देताना दिसते. आता अशाच साध्या कपड्यातील फिटनेस लूकमध्ये साराचा स्टेजवर बिंधास्तपणे डान्स करताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
साराने दाखवले जबरदस्त डान्स स्टेप्स
साराने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका पुुरस्कार सोहळ्यासाठी तयारी करताना दिसत आहे. अशामध्ये ती फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यापूर्वी सराव करताना दिसते. तिचा हा व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, तिला सर्वकाही परफेक्ट करायचे आहे.
क्लासिकल डान्स करतानाही दिसली
व्हिडिओमध्ये साराचे डान्स स्टेप्स पाहताक्षणीच आवडू लागतील. तिने अनेक ठिकाणी क्लासिकल डान्स स्टेप्सही केले आहेत. हे पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. यादरम्यान साराने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि राखाडी- काळ्या रंगाचे शॉर्ट्सही घातले आहेत. डान्स सरावादरम्यान तिने अनेकवेळा बूूट्स घातल्याचेही दिसत आहे.
अनेक गाण्यांवर केला परफॉर्मन्स
साराचा व्हिडिओ पाहून समजते की, तिने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. तिने वेगवेगळ्या लूकमधील फोटोही दाखवले होते. यात ती भारतीय पोषाखात, तर काही फोटोत परदेशी लूकमध्ये दिसली.
आगामी प्रकल्प
साराच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. चित्रपटातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘केदारनाथ’ चित्रपटातून केले होते पदार्पण
साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. ‘केदारनाथ’नंतर साराने रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंबा’ चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. ती शेवटची ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…