बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. कधी फोटो शेअर करून आणि कधी डान्स व्हिडिओ करूनही अभिनेत्री चाहत्यांची मने जिंकते. सारा तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती मनोरंजक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती खूप प्रशंसा मिळवते. साराची ही बबली स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडते. त्याचवेळी अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांची मने जिंकत आहेत.
साराने (Sara Ali Khan) अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ब्लॅक टॉपमध्ये तीन फोटो शेअर केले आहेत. या तिन्ही फोटोंमध्ये तिची स्टाईल एकदम मस्त दिसतेय. मोकळे केस आणि न्यूड मेकअप तिला खूप छान दिसत आहे. सूर्यप्रकाशात तिच्या तिन्ही पोझ चाहत्यांची मने जिंकत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “व्हॅलेंटाईन वीकमध्ये एवढा ग्लॅमरस लूक पाहायला काय हरकत आहे,” तर दुसऱ्याने “खूप क्यूट” लिहिले.
सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) दिसला होता. यानंतर तिने ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याचबरोबर सारा ‘कुली नंबर १’मध्ये अभिनेता वरुण धवन (Vrun Dhavan) सोबत दिसली होती.
सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच तिचा ‘अतरंगी’ रे हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याची धनुषसोबतची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती. तसेच, अक्षय कुमारच्या खिलाडी अंदाजाने चित्रपटाचा मनोरंजनाचा डोस दुप्पट केला होता. आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले, तर सारा अली खान आता विकी कौशलसोबत तिच्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे.
हेही वाचा –