Saturday, March 15, 2025
Home टेलिव्हिजन धक्कादायक! वजन वाढल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीची शोमधून हकालपट्टी, व्यक्त केलं दु:ख

धक्कादायक! वजन वाढल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीची शोमधून हकालपट्टी, व्यक्त केलं दु:ख

समाजातील स्त्रियांचे सौंदर्य आणि आकर्षण म्हणजे त्यांचे शरीर आणि गोरा रंग, असे म्हटले जाते. एखादी स्त्री सडपातळ असेल किंवा ती गोरी असेल, तर समाजाच्या नजरेत ती खूप सुंदर असते. तर दुसरीकडे जाड आणि काळा रंग असलेल्यांना विविध प्रकारचे सल्ले दिले जातात. काळ बदलला आहे, पण पाहिजे तसा बदललेला नाही. आज जेव्हा आपण मनोरंजन उद्योगाकडे पाहतो, तेव्हा आपण आधुनिक कल्पनांसह वाढलेले आहोत. परंतु या उद्योगात देखील पूर्वीच्या समाजाप्रमाणेच सौंदर्याची व्याखा केली जाते. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी लठ्ठपणा आणि सावळ्या रंगामुळे किती त्रास सहन करावा लागतो हे सांगितले आहे. अशातच आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने आपले कटू अनुभव शेअर केले आहेत.

‘गुम है किसी के प्यार में’मध्ये श्रुतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शफाक नाझ (Shafaq Naaz) ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना त्यांच्या काळ्या रंगामुळे आणि लठ्ठपणामुळे कटू अनुभवाचा सामना करावा लागला आहे. दिलेल्या एका मुलाखतीत शफाकने खुलासा केला आहे की, इंडस्ट्रीतील स्टार्सना त्यांच्या शरीराच्या आकारामुळे आणि सौंदर्याचा दर्जा यामुळे कसा दबाव टाकला जातो. अभिनेत्रींना नेहमी स्लिम राहायला सांगितलं जातं. शफाकने तिच्यासोबतचा एक अनुभवही शेअर केला, ज्यात ती लठ्ठ असल्यामुळे तिला नकार देण्यात आला होता. (actress shafaq naaz talk about beauty standards of industry)

हा अनुभव सांगताना शफाक म्हणाली, “एकदा मी ऑडिशनला गेले होते. तिथे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, ते मला कास्ट करू शकत नाहीत, कारण माझे वजन वाढले होते. हे जाणून मला धक्काच बसला. गुबगुबीत किंवा जड असलेल्या इतर मुली दररोज यातून कसे जातात, याची मी कल्पना करू शकत नाही. काही काळापूर्वी मला बरे वाटत नव्हते, त्यामुळे माझे वजन वाढले होते.”

शफाक नाझने हे देखील सांगितले की, या सौंदर्य मानकांचा लोकांवर कसा परिणाम होतो. ‘चिडिया घर’ फेम अभिनेत्री म्हणाली, “मला वाटतं, कलाकार कोणत्याही वयाचा किंवा आकाराचा असू शकतो. पण तो चांगला कलाकार असेल, तर काही फरक पडत नाही. मी माझ्या स्वत: च्या शरीरात कम्फर्टेबल आहे. परंतु अलीकडे जेव्हा मी हे सर्व पाहते, तेव्हा माझ्या मनात ते सतत चालू राहते.” तसेच, शोबिझमध्ये स्थापित केलेल्या या बनावट सौंदर्य मानकांचा अंत करणे खूप आवश्यक आहे, असेही ती यावेळी म्हणाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा