Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड टास्कदरम्यान शमिता जखमी; कुशीत उचलून राकेशने नेले ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात

टास्कदरम्यान शमिता जखमी; कुशीत उचलून राकेशने नेले ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये प्रेम आणि वाद दाखवले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेक्षकांना ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये भरपूर मसालेदार गोष्टी पाहायला मिळत आहेत. काही स्पर्धक सतत एकमेकांशी लढत असताना, तर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील जवळीकता वेळेबरोबर वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांचे कनेक्शन आता बदलले आहे. एकमेकांनाही ते  आवडतात.

मात्र, आता ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी एक नवीन ट्विस्ट आणून सर्वांना धक्का दिला आहे. सर्व स्पर्धक एकटे- एकटे झाले आहेत. प्रेक्षकांना राकेश आणि शमिताची जोडी आवडते. अलीकडेच, शमिता एका टास्कदरम्यान जखमी झाली, त्यानंतर राकेशने तिला उचलून घरात नेले. दोघेही हळूहळू त्यांच्या मैत्रीला एका नवीन वळणावर घेऊन जात आहेत. राकेश अनेकदा शोमध्ये शमिता शेट्टीला किस करताना दिसतो, कधी गालावर तर कधी हातावर तो किस करतो.

शमिता राकेशवर संतापली
शमिता आणि राकेशचे फोटो सोशल मीडियावर चांगलाचे व्हायरल होत आहेत. दोघांच्या बाँडिंगवर प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकताच शमिता आणि दिव्या यांच्यातही वाद झाला होता. त्यानंतर शमिता बाथरुमच्या परिसरात राकेशसोबत रागात बोलत होती. या दरम्यान, राकेश शमिताचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. शमिताला सतत राग येत होता आणि ती त्याच्यासोबत त्याला राहायला सांगत होती.

यानंतर राकेशने शमिताला मिठी मारली आणि तिला किस केले. शमिता सतत राकेशला सांगत होती की, ती दिव्यासोबत राहू शकणार नाही. तिला मानसिकरीत्या बरे वाटत नाही. शमिता अनेकदा राकेशला दिव्यापासून दूर राहण्यास सांगताना दिसते. यावर राकेश म्हणतो की, “तू हे मला सांगू नकोस.” यानंतर पुढे बोलताना तो म्हणतो की, “या विषयावर मला आता काहीच बोलायच नाही.”

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये, शमिता आणि राकेश यांनी एकमेकांबद्दलची आवड व्यक्त केली. शमिता नेहा भसीनला राकेश एक चांगली व्यक्ती आहे असे सांगताना दिसली, पण काही वेळी ती स्वतः राकेशबद्दल थोडी गोंधळून जाते, जे तिच्यासाठी थोडे त्रासदायक असते. तिने तिचा निर्णय घेतला आहे आणि ती तो बदलणार नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

हे देखील वाचा