Friday, July 5, 2024

चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली शशिकाला, ‘या’ कारणामुळे लोकांच्या घरी करावा लागला झाडू-पोछा

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांची चर्चा आहे, ज्या आता आपल्यात नाही, पण त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से जे आज ही चर्चेत आहेत. शशिकला यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ४० आणि ५० च्या दशकात शशिकला चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करून प्रसिद्धीच्या झोतात आल्या. मात्र, चित्रपटांमध्ये येण्याचा प्रवास शशिकला यांच्यासाठी खूप कठीण होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, शशिकला यांचा जन्म अतिशय श्रीमंत घरात झाला होता. अभिनेत्रीचे वडील मोठे उद्योगपती होते. मात्र, काळ बदलला आणि शशिकला यांच्या वडिलांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले त्यामुळे त्यांना सर्व काही सोडून मुंबईत यावे लागले.

मुबंईत आल्यानंतरही शशिकला (Shashikala)आणि त्यांच्या कुटुंबियांसमोरील आव्हाने कमी झाली नाहीत. असे म्हटले जाते की घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शशिकला यांना लोकांच्या घरी झाडू आणि भांडी साफ करण्याचे काम करावे लागले. मात्र, आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या नूरजहाँने शशिकला यांना चित्रपटात काम करायला लावले.

नूरजहाँने शशिकलाला तिच्या पतीच्या ‘झीनत’ चित्रपटात एक कव्वालीचा सीन मिळवून दिला आणि अशा प्रकारे शशिकला यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला. २००७ साली भारत सरकारने शशिकला यांना सिनेमातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, शशिकला यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते.

अभिनेत्री २० वर्षांची असताना तिचे लग्न झाले होते. या लग्नापासून तिला दोन मुलीही झाल्या, पण पतीसोबत तिचं जुळली नाही आणि लवकरच शशिकला यांचा घटस्फोट झाला. शशिकला एका व्यक्तीसोबत परदेशात गेल्या होत्या, पण इथेही त्यांची फसवणूक झाली होती. यानंतर, अभिनेत्री भारतात परतली आणि संपूर्ण नऊ वर्षे मदर तेरेसांसोबत लोकांच्या सेवेत गुंतली. ४ एप्रिल २०२१ रोजी शशिकला यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

महिलेला फसवल्यामुळे ‘हा’ कलाकार सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पहिल्या ऑस्करपासून ते परदेशातल्या पहिल्या शूटिंगपर्यंत, स्वातंत्र्यानंतरच्या सिनेसृष्टीतील कामगिरी वाचा

‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान’, अभिनेत्रीने क्रॉप टॉप घालून तिरंगा फडकावल्याने भडकले चाहते, शिकवला चांगलाच धडा

हे देखील वाचा