Saturday, June 29, 2024

नेहमीच शांत असणारी शहनाझ ‘या’ गोष्टीवर भडकली, पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाला महत्त्वाचा क्षण

‘त्वाडा कुत्ता टॉमी, सड्डा कुत्ता कुत्ता’ असे म्हणत लाईमलाईटमध्ये येणारी अभिनेत्री म्हणजे, शहनाझ गिल होय. शहनाझ जिथेही जाते, तिथे ती तिचा सर्व ग्लॅमर घेऊनच जाते. सध्या शहनाझला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. तिच्या ड्रेसिंग स्टाईलपासून ते तिच्या हटके अंदाजापर्यंत सर्वकाही चाहत्यांना आवडत आहे. शहनाझ तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच तत्पर असते. मग ते पॅपराजींना फोटोसाठी पोझ देणे असो किंवा मग त्यांच्याशी चर्चा करणे असो, ती एकही संधी सोडत नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे शहनाझ कॅमेऱ्यासाठी पोझ देत होती, पण पुढे जाताना तिच्या सँडलने सर्वकाही बिघडवून टाकले. शहनाझचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

शहनाझच्या पायाला दुखापत
शहनाझ गिल (Shehnaaz Gill) हिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती पॅपराजींना फोटोसाठी पोझ देत त्यांच्याशी संवाद साधत होती. तिने बराच वेळ त्यांची विचारपूस करण्यात घालवला. शहनाझच्या पायाला आधीपासूनच दुखापत (Shehnaaz Gill Injured) झाली होती. या व्हिडिओत ती म्हणताना दिसत आहे की, तिला दुखापत झाली आहे आणि ती बरी होत नाहीये. यानंतर पॅपराजी तिला म्हणाले की, दुखापत कशी झाली, ज्यावर ती चेहऱ्यावर गोड एक्सप्रेशन्स आणताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हील्समुळे झाली चिंता
दुसऱ्या एका व्हिडिओत शहनाझ तिथून निघताना दिसत आहे. यामध्ये ती हील्स घालून लंगडत चालताना दिसत आहे. काही अंतर दूर गेल्यावर ती तिची चप्पल काढते. तिचा हा हावभाव पाहून ती हील्स घालून अस्वस्थ झाल्याचे दिसते. कारण, तिनी रागाने तिचे हील्स काढून फेकले आहेत. जसे तिला तिच्या हील्सचा कंटाळाच आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शहनाझ गिलचे ट्रान्सफॉर्मेशन
अभिनेत्री शहनाझ गिल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर लाखो चाहते फॉलो करतात. तसेच, तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट होताच, त्यावर लाखो लाईक्सचा पाऊस पाडतात. शहनाझ मागील काही काळात जे ट्रान्सफॉर्मेशन केले आहे, ते नक्कीच प्रशंसनीय आहे.

शहनाझच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हौसला रख’ या सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

फक्त ‘या’ एका कारणामुळे बंद होणार ‘साथ निभाना साथिया २’, गेहना बहूने केला खुलासा

अरेरे! मलायकाने घातला असा ड्रेस की, तिला पाहताच चाहत्यांची सटकली; काहींनी तर केल्या घाणेरड्या कमेंट्स

‘सैराट’मधील आर्ची येणार नव्या कार्यक्रमातून भेटीला, प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय

हे देखील वाचा