Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ करणार शूटिंग सुरू? वाचा काय म्हणाले ‘हौसला रख’ चित्रपटाचे निर्माते

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (२ सप्टेंबर) निधन झाले होते. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडविश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली गेली. मात्र, सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने त्याची सर्वात जवळची मैत्रीण शहनाझ गिलच्या आयुष्यावर प्रचंड परिणाम झाला. ती प्रचंड दुखावली गेली आहे. मात्र, ती आता या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ती या धक्क्यामुळे तिच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या देखील पूर्ण करू शकत नाही.

शहनाझ गिलने सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी ‘हौंसला रख’ हा पंजाबी चित्रपट साईन केला होता. या चित्रपटात ती पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्यासोबत दिसणार आहे. मात्र, शहनाझमुळे या चित्रपटाचे शूटिंग होत नाही. निर्मात्यांना विश्वास आहे की, शहनाझ लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाचे प्रमोशनल गाणे १५ सप्टेंबर रोजी शूट केले जाणार होते. परंतु निर्मात्यांनी ते पुढे ढकलले. कारण शहनाझ यावेळी शूट करण्याच्या स्थितीत नाही.

माध्यमांशी संवाद साधताना, ‘हौंसला रख’ या चित्रपटाचे निर्माते दिलजीत थिंड म्हणाले की, “आम्ही शहनाझच्या पुन्हा येण्याची आणि दुःखातून सावरण्याची वाट पाहत आहोत. आम्ही १५ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये गाणे शूट करण्याची योजना आखली होती. परंतु शहनाझ त्या स्थितीत नसल्यामुळे ते होऊ शकले नाही. आम्ही लवकरच एक नवीन तारीख निश्चित करू आणि शहनाझलाही या चित्रपटाचा एक भाग बनण्याची इच्छा आहे. तसेच ती चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. मी तिच्या मॅनेजरच्या संपर्कात आहे आणि आशा आहे की, ती काही दिवसात आमच्याशी संपर्क साधेल.”

दिलजीत दोसांझ आणि शहनाझ गिल व्यतिरिक्त, ‘हौंसला रख’मध्ये गिप्पी ग्रेवालचा मुलगा शिंदा ग्रेवाल आणि सोनम बाजवा देखील आहेत. अमरजीत सिंग सरोन दिग्दर्शित या चित्रपटासह निर्माता म्हणून दिलजीत दोसांझचा हा पहिला चित्रपट आहे. स्टोरी टाईम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तो चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे लेखन राकेश धवन यांनी केले आहे आणि हा चित्रपट यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ आणि शहनाझ गिल या जोडीला मोस्ट लव्ह जोडीचा पुरस्कारही मिळाला होता. दोघांनाही ‘सिडनाज’ हे नाव दिले होते. दोघांची जवळीक बघून असा अंदाज बांधला गेला की, या दोघांचे नाते मैत्रीपेक्षा जास्त आहे, पण ही मैत्री २ सप्टेंबरला तुटली. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारादरम्यान, शहनाज बेशुद्ध अवस्थेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

हे देखील वाचा