Saturday, June 29, 2024

पॅपराजींमुळे शहनाजला लागला हजार रुपयांचा चुना; म्हणाली, ‘तुमच्यामुळंच झालंय हे…’

टीव्ही अभिनेत्री शहनाज गिल ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. ती नेहमी असे काही करते, ज्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होऊ लागते. शहनाजचा मजेशीर अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. सोशल मीडियावरही तिचा कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होतो, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधले जाते. अशातच आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणत आहे की, पॅपराजींमुळे तिला एक हजार रुपये खर्च करावे लागले.

एका इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शहनाज गिल (Shehnaaz Gill) पार्लरमधून बाहेर पडताना दिसत आहे. निळ्या जीन्स आणि सैल पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये शहनाज खूपच स्टायलिश दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, जशी शहनाज पार्लरमधून बाहेर पडते, पॅपराजी तिला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ लागतात. शहनाजही (Shehnaaz Gill Independence Day Wish) त्यांना शुभेच्छा देते.

शहनाजचे वक्तव्य
यादरम्यान शहनाज म्हणते की, “तुमच्या नादात मलाच हजार रुपये देऊन केस सरळ करावे लागले. मला वाटले तुम्ही लोक बाहेर उभे आहात.” यानंतर शहनाजने पॅपराजीला पोझही दिले आणि तिच्या गाडीत बसून रवाना झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तिच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. एका चाहत्याने तिच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, “आमची शायनिंग स्टार, शहनाज गिल.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “ही खूपच गोड मुलगी आहे.”

सलमान खानच्या सिनेमातून बाहेर पडल्याच्या अफवा
अभिनेत्री शहनाज गिल ही सलमान खान (Salman Khan) याच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या आगामी सिनेमातून बाहेर पडल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, या खोट्या अफवा होत्या. अभिनेत्रीने स्पष्ट करत सांगितले होते की, या अफवा खोट्या आहेत. यानंतर तिच्या चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
शूटिंगवेळी हॉस्पिटलमधून ‘या’ अभिनेत्याला घेऊन धावताना दिसला थालापती विजय, व्हिडिओ जोरदार व्हायरल
इवल्याशा वयातही फोटोसाठी पोझ देताना दिसली आलियाची भाची, चाहते म्हणाले, ‘ही तर डिट्टो रणबीरसारखी दिसते’
आनंदाची बातमी! बिपाशाने फोटो शेअर करत एकदाचं सांगूनच टाकलं, पाहून तुम्हीही व्हाल खुश

हे देखील वाचा