दिलजीत दोसांझ आणि शहनाझ गिल स्टारर फिल्म ‘हौंसला रख’ शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दिलजीत, शहनाझ, सोनम बाजवा याशिवाय या चित्रपटाचा आणखी एक स्टार आहे, ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. ‘हौंसला रख’ या चित्रपटात शिंदा ग्रेवाल शहनाझ गिलचा ऑनस्क्रीन मुलगा आहे. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
पंजाबी चित्रपटांमध्ये लोकप्रिय
क्यूटनेसने ओव्हरलोड झालेल्या या छोट्या कलाकाराची ही पहिली पायरी नाही. तो पंजाबी सिनेमा जगतात खूप लोकप्रिय आहे. शिंदा ग्रेवाल पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालचा मुलगा आहे आणि तो अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. तो क्यूटनेसच्या बाबतीत तैमूर, इनायालाही स्पर्धा देत आहे. एवढेच नाही, तर तो त्याच्या वडिलांच्या प्रोडक्शनच्या अनेक प्रोजेक्टचा एक भाग आहे. शिंदाला दोन भाऊही आहेत. एकोम ग्रेवाल आणि गुरबाज ग्रेवाल अशी त्यांची नावे आहेत.
अभिनयाचा मास्टर आहे शिंदा
‘हौंसला रख’ चित्रपटाच्या टीमने शिंदा ग्रेवालचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, तो खरोखर टॅलेंटचा खजिना आहे. शिंदा खूप पटकन गोष्टी कॅच करतो आणि त्याच्या पात्रासाठी खूप लवकर तयार होतो. आगामी काळात शिंदा ग्रेवाल पंजाबी चित्रपटात राज्य करू शकतो, असे टीमचे म्हणणे आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर तो त्यात शहनाझ गिलच्या मुलाची भूमिका साकारत आहे.
शहनाझसोबतचे असे आहे बाँडिंग
पडद्यावर शिंदा ग्रेवालच्या क्यूटनेसशिवाय त्याची निरागसता प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. स्क्रीनवर त्याचे एक छोटे स्मित चाहत्यांच्या हृदयात हजारो फुले फुलवत आहे. शहनाझ गिलसोबतची त्याची केमिस्ट्री आश्चर्यकारक आहे आणि दोघांमध्ये दिसणारा ताळमेळ पडद्यावरही चाहत्यांना आवडत आहे. खऱ्या जीवनातही शिंदा आणि शहनाझ गिलचे बाँडिंग खूप चांगले आहे.
शिंदाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘अरदास करण’ या पंजाबी चित्रपटातून केली होती. तो केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर म्युझिक व्हिडीओमध्येही दिसला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘एक अपुरे गाणे, एक अपुरी कहाणी’; ‘अधुरा’चे पोस्टर रिलीझ, शेवटचे दिसणार एकत्र ‘सिडनाझ’
-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत
-सिद्धार्थ गेल्यानंतर भावनिक गाणं गाताना दिसली शेहनाझ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही अनावर होतील अश्रू