बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकातील खूप कमी अभिनेत्री अशा आहेत, ज्यांची गणना ‘फिटनेस क्वीन’ अभिनेत्रींमध्ये होते. त्यापैकीच एक म्हणजे, अभिनेत्री शिल्पा शेट्टी होय. शिल्पा आता इंटरनेट सेन्सेशन होत चालली आहे. शिल्पा नेहमीच हटके पोस्ट शेअर करत चाहत्यांना आकर्षित करत असते. विशेष म्हणजे, शिल्पाचा चाहतावर्ग इतका जास्त आहे की, तिची कोणतीही पोस्ट शेअर होताच, सोशल मीडियावर व्हायरल होते. अशातच आता शिल्पाच्या नवीन पोस्टने चाहत्यांना तिच्यासोबत डान्स करण्यास भाग पाडले आहे. शिल्पाच्या नवीन व्हिडिओमध्ये ती अभिनेता रणवीर सिंगच्या ‘तत्तड- तत्तड’ या गाण्याची हुक स्टेप एन्जॉय करताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
रणवीरच्या गाण्यावर शिल्पाचा धमाकेदार डान्स
शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन रील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी रणवीर सिंगच्या ‘रामलीला’ चित्रपटातील ‘तत्तड तत्तड’ या सुपरहिट गाण्याची हुक स्टेप करताना मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. विशेष बाब म्हणजे शिल्पा या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी केलेला तिचा अंडरकट बझ हेअर कट देखील फ्लॉंट करत आहे. व्हिडिओमध्ये शिल्पाचे खोडकर एक्सप्रेशन पाहून चाहत्यांना खूप मजा येत आहे आणि चाहत्यांना तिच्यासोबत डान्स करण्यास भाग पाडले जात आहे. (Actress Shilpa Shetty Copied Ranveer Singh Fmous Tattad Tattad Song)
डान्सच्या मूडमध्ये शिल्पा
व्हिडिओ शेअर करत शिल्पाने सांगितले की, ती डान्स करण्याच्या मूडमध्ये होती, त्यामुळे तिने रणवीर सिंगकडून प्रेरणा घेतली. व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज काही वेळाने डान्स करण्याचा मूड झाला, तेव्हाच मी रणवीर सिंगच्या स्टाईलने प्रभावित झाले.”
शिल्पाच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
शिल्पाचा मजेशीर व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही तासांतच हजारो लोकांनी शिल्पाच्या व्हिडिओला लाईक केले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १९ लाख व्ह्यूज आणि १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये हार्ट इमोजींचा पूर आला आहे. चाहते त्यांच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे देत आहेत आणि अभिनेत्रीच्या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.
शिल्पाच्या कामाबाबत बोलायचं झाल, तर ती शेवटची ‘हंगामा २’ या चित्रपटात दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…