बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिल्पा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ती तिच्या सौंदर्याबद्दल असो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. शिल्पाची लाडकी मुलगी समिशाचा मंगळवारी (१५ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. छोटी राजकुमारी समिशा २ वर्षांची झाली आहे. समिशाच्या वाढदिवशी अभिनेत्री शिल्पाने तिच्या मुलीसोबतचा एक क्यूट व्हिडिओ शेअर करून, तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये समिशा तिच्या आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
शिल्पाचे कुटुंब सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. सोमवारी (१४ फेब्रुवारी) तिचा प्रेमळ पती राज कुंद्रासोबत (Raj Kundra) व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानंतर आज शिल्पा शेट्टी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करत आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राज कुंद्रा त्यांच्या छोट्या राजकुमारीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.
मुलीचा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. शिल्पाने लिहिले की, “माईन! तू आमच्या आयुष्यात आनंद भरला आहेस. आमचे हृदय प्रेम आणि आनंदाने भरल्याबद्दल धन्यवाद. माझी प्रिय प्रिय समिशा. तू पहिला श्वास घेण्यापूर्वी तुझ्यावर प्रेम केले आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझे रक्षण करण्याचे वचन दिले आहे.”
छोटी समिशा शिल्पा शेट्टीसाठी आहे पजेसिव्ह
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज कुंद्रा शिल्पा शेट्टीला किस करून समिशाची छेड काढताना दिसत आहे. पण लहान समीशा घाईघाईने तिच्या आईला किस करते आणि म्हणते की, ती माझी आहे. शिल्पा आणि राजचा समिशासोबतचा हा क्यूट व्हिडिओ पाहून चाहते स्वत:ला व्वाह… म्हणण्यापासून रोखू शकले नाहीत. फिकट गुलाबी रंगाची फ्रॉक परिधान केलेली समिशा एखाद्या बाहुलीपेक्षा कमी दिसत नाही. समिशाच्या या गोंडसपणावर चाहते इंप्रेस झाले आहेत आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा –
- ‘जर तुम्ही भाग्यवान असाल, तर…’, म्हणत ऋता दुर्गुळेने प्रतिकसाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लिहिली रोमॅंटिक पोस्ट
- ‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या क्रूर आणि दमदार भूमिकेने वेधले सर्वांचे लक्ष
- राज कपूर यांनी स्वभावाने लाजाळू असणाऱ्या दिलीप कुमार यांची ‘अशी’ घेतली फिरकी, वाचा भन्नाट किस्सा
हेही पाहा-