Friday, July 5, 2024

शिल्पा शेट्टीने बहीण शमितासाठी पाठवला खास मॅसेज; व्हिडिओ पाहून रडू लागली अभिनेत्री

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने सहभाग घेतला आहे. हा शो सुरू होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. याच दरम्यान तिची बहीण शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तुरुंगात असताना शमिता बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. शमिताच्या प्रवेशाने सगळेच स्तब्ध झाले होते. शमिता शेट्टी आजकाल ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये आपली कमाल दाखवत आहे. याच दरम्यान शिल्पाने बहीण शमिताला एक खास संदेश पाठवला.

शमिता बिग बॉसच्या घरात येण्यावर अनेक प्रश्न निर्माण होत होते. यावर तिने स्पष्टपणे सांगितले होते की, तिने अगोदरच कमिटमेंट केली होती. शोमध्ये कुटुंबाबद्दल बोलताना शमिता भावुक झाली. अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी शिल्पा शेट्टीने बहीण शमितासाठी एक विशेष व्हिडिओ संदेश पाठवला, जो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

शमिता झाली भावूक
रक्षाबंधनाच्या दिवशी ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये चाहत्यांना एक विशेष तडका पाहायला मिळाला आहे. हिना खान रविवारी शोमध्ये दिसली आणि तिने स्पर्धकांच्या भावंडांची ओळख करून दिली. हिनाकडून व्हिडिओ संदेश मिळाल्यानंतर सर्व स्पर्धक भावुक होताना दिसून आले आणि सर्व स्पर्धकांना कुटुंबाची आठवण येऊ लागली. याच दरम्यान, शमिताला तिची बहीण शिल्पाकडून एक विशेष संदेश मिळाला, तो पाहिल्यानंतर ती देखील भावुक झाली.

शमिताला संदेश देताना शिल्पा म्हणाली की, “तू खूप हुशारीने खेळायला हवं आणि तुझी प्रभावी भूमिका सोडण्याची गरज आहे. आई चांगली आहे आणि तिच्याबरोबर सर्व काही ठीक आहे.” त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून शमिताच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले.

इतकेच नव्हे तर या एपिसोडमध्ये शमिता असे म्हणाली की, “माझा इंडस्ट्रीमध्ये खूप कठीण प्रवास झाला आहे. पण मला आता जास्त विश्वास आहे, लोक अजूनही मला शिल्पाची बहीण म्हणून ओळखतात. ती एक संरक्षक सावली आहे. मी भाग्यवान आहे की, लोक मला माझ्या नावाने ओळखत नाहीत, पण तिची बहीण म्हणून ओळखतात.”

बिग बॉसने या सर्व स्पर्धकांना रक्षाबंधनाचे सर्वांना खास गिफ्ट दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा