Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड वाऱ्याने घोळ केला राव; फोटोसाठी पोज देत होती शिल्पा शेट्टी, तितक्यात आली वाऱ्याची झुळुक आणि…

वाऱ्याने घोळ केला राव; फोटोसाठी पोज देत होती शिल्पा शेट्टी, तितक्यात आली वाऱ्याची झुळुक आणि…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिल्पा नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिल्पा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मग ती तिच्या सौंदर्याबद्दल असो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. तसे, शिल्पा १९९३ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘बाजीगर’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमटवल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ती छोट्या पडद्याकडे वळवली आहे.

शिल्पाचे सतत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याच क्रमात तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बुधवारी (२ फेब्रुवारी) शिल्पाची बहीण शमिता शेट्टीचा वाढदिवस आहे. तिने आपल्या बहिणीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावेळी शिल्पा केशरी रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली.

दरम्यान, शिल्पाने तिथे उपस्थित असलेल्या पॅपराझींना अनेक पोझही दिल्या. मात्र जोरदार वाऱ्यामुळे तिला तिचा ड्रेस सांभाळण्यात खूप अडचणी आल्या. पोझ देताना ती अनेकवेळा स्वत:ला सावरताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र यावेळी शिल्पा खूपच सुंदर दिसत होती.

शिल्पा शेट्टीला अभिनयाव्यतिरिक्त डान्स, कुकिंग आणि योगा करायला आवडतो. शिल्पाला स्वयंपाकासोबतच खाण्याची खूप आवड आहे. तिला करी रोटी, कॉर्न पुलाव, चिकन बिर्याणी, साउथ इंडियन फूड, पाणीपुरी, उपमा आणि इडली हे सर्व पदार्थ खायला आवडतात. शिल्पा शेट्टीला ‘कराटे’मध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. शिल्पा तिच्या फिटनेसबाबत खूप सक्रिय आहे.

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’ या रियॅलिटी शोचे परीक्षण करत आहे. ती शेवटची ‘हंगामा २’ चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा