आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टीचाही समावेश होतो. शिल्पाने विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर पसरवली आहे. असे असले, तरीही ती आपल्या चित्रपटांपेक्षा कमी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला. यामुळे ती खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे. नुकतेच तिला पॅपराजींनी स्पॉट केले. यावेळी तिने काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि पांढऱ्या रंगाची चेक स्कर्ट परिधान केला होता. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. याव्यतिरिक्त तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेरणादायी पोस्ट शेअर करून आपल्या मनातील गोष्ट सांगितली आहे.
शिल्पाचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओत शिल्पा आपल्या गाडीतून उतरून कुठेतरी जाताना दिसत आहे. यादरम्यान तिने काळे गॉगल्स आणि मास्कही घातला होता. यामध्ये ती एकदम आकर्षक दिसत आहे. विशेष म्हणजे, पॅपराजींनी तिला सांगितल्यानंतर अभिनेत्रीने मास्क काढून स्माईल देत हटके पोझमध्ये फोटोही काढले. यावेळी ती आत्मविश्वासाने भरलेली दिसली. (Actress Shilpa Shetty Shares Motivational Post And Smile Back On Her Face)
याव्यतिरिक्त शिल्पाने आपल्या इंस्टाग्रामवर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. तिने फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा फायटिंगचा अंदाज दिसत आहे. आपल्या फोटोमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही आतापर्यंत तिथे पोहोचला नाही, परंतु काल तुम्ही जिथे होता, त्यापेक्षा जवळ आहात.”
शिल्पाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचलता, मग ते लहान असो वा मोठे, ते तुमचे स्वप्न जवळ आणण्यात मदत करतात. तुम्हाला किती दूर जायचे आहे, याबद्दल विचार करू नका आणि नाराज, चिंतीत होऊ नका. तुम्ही यासाठी किती मेहनत घेत आहात, त्याचा अभिमान बाळगा आणि पुढे चला. कालच्या तुलनेत तुम्ही स्व:ला चांगले बनवण्याच्या दिशेने पुढे जात राहा. तुम्ही आपले असे ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. याचा फायदा उचला.”
शिल्पाच्या या पोस्टला ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि ७०० पेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
याव्यतिरिक्त शिल्पाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती ‘सुपर डान्सर ४’चे परीक्षण करत आहे. यासोबतच ती शब्बीर खान दिग्दर्शित ‘निक्कमा’ चित्रपटातही काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन